आजचे शेअर बाजार 'विश्लेषण': शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात घसरण निफ्टी २६३०० व सेन्सेक्स ८५२०० पेक्षा कमी पातळीवर 'ही' आहेत कारणे

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेत शेअर बाजारात अपेक्षित घसरण झाली आहे. आज मोठ्या प्रमाणात सेल ऑफ व नफा बुकिंग झाल्यामुळे बाजारातील घसरण सलग चौथ्या सत्रात कायम राहिली आहे. सेन्सेक्स ३७६.२८ अंकाने घसरत ८५०६३.३४ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ७१.६० अंकाने घसरत २६१७७.७० पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टी २६३०० पातळीपेक्षा कमी झाला असून सेन्सेक्स ८५२०० पातळीपेक्षा घसरला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकातील आज किरकोळ वाढ झाल्याने बाजाराला धोक्याच्या पातळीपासून आधार मिळाला आहे. मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही आज घसरण कायम राहिली असून क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक घसरण तेल व गॅस, रियल्टी, मिडिया, केमिकल्स निर्देशांकात झाली आहे. वाढ निफ्टी ५०० हेल्थकेअर, मिडस्मॉल हेल्थकेअर, हेल्थकेअर, फार्मा, आयटी निर्देशांकात झाली आहे.


युएस व्हेनेझुएला यांच्यातील तणाव आज कायम असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजच्या भारतावरील टॅरिफमधील व कच्च्या तेलाच्या बाबतीत नवे वक्तव्य आल्याने बाजारात अस्थिरता कायम होती. यासह सध्या कंपन्याचे तिमाही निकाल लागत असताना आजही घरगुती गुंतवणूकदारांच्या विक्रीसह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली विक्री कायम ठेवल्याने बाजारात बियरिश वातावरण कायम राहिले आहे. मोठ्या प्रमाणात आज दिग्गज शेअर्समध्येही सेल ऑफ झाल्याने बाजारातील घसरणीचा टेक्निकल पॅटर्न कायम राहिला आहे. विशेषतः एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या लार्जकॅप शेअर्समध्ये घसरण झाल्याचा निर्देशांकात परिणाम दिसत आहे. अनपेक्षित तेजीचा नवा कुठलाही विशेष ट्रिगर बाजारात नसल्याने त्याचा सकारात्मक परिणाम बाजारात झाला नाही. याशिवाय विशेष बाब म्हणजे डॉलरच्या तुलनेत रूपयांची १८ पैशाने वाढ झाल्याने अस्थिरता निर्देशांक सकाळच्या १% वाढी नंतर उलट १% पातळीपेक्षा कमी पातळीवर कोसळला ज्यामुळे बाजारात दुपारनंतर काही प्रमाणात स्थिरता आली आहे. दुसरीकडे कमोडिटी बाजारात चढउतार कायम असताना सकाळी किंमत घसरती असताना सोने चांदीत आज तुफान वाढ झाली आहे.


अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील तेजीचा अंडरकरंट कायम असल्याने गिफ्ट निफ्टी, सेट कंपोझिट वगळता इतर निर्देशांकात वाढ झाली आहे ज्यामध्ये सर्वाधिक वाढ तैवान वेटेड, कोसपी, जकार्ता कंपोझिट निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स मधील अतिशय किरकोळ घसरण वगळता इतरत्र दोन एस अँड पी ५००, नासडाक कंपोझिट निर्देशांकात वाढ झाली आहे.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ आयईक्स (१०.६३%), क्रिसील (५.०१%), नावा (४.७९%), डिवीज लॅब्स (४.३८%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण ट्रेंट (८.६३%), काईन्स टेक (५.१६%), स्विगी (४.६०%), कमिन्स इंडिया (४.१६%), महानगर गॅस (४.१६%), केईसी इंटरनॅशनल (३.१३%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसीसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे, लार्जकॅप स्टॉक्सच्या नेतृत्वाखाली देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली. व्हेनेझुएला-अमेरिका संकटाभोवतीची अनिश्चितता आणि रशियन तेल आयातीचा मुद्दा, तसेच आगामी तिसऱ्या तिमाहीच्या निकालांबद्दलच्या अपेक्षा, या घटकांचा बाजाराच्या प्रतिक्रियेवर परिणाम झाला. बहुतेक क्षेत्रांमध्ये नफावसुली झाली असली तरी, फार्मा, बँकिंग आणि आयटी क्षेत्राने चांगली कामगिरी केली. निकालापूर्वीच्या सकारात्मक व्यावसायिक अद्यतनांमुळे बँकिंग शेअर्सना आधार मिळाला. डिसेंबर महिन्यासाठी भारतीय फार्मास्युटिकल मार्केटने (IPM) नोंदवलेल्या सातत्यपूर्ण वाढीमुळे फार्मा शेअर्समध्ये वाढ झाली. नजीकच्या काळात, अमेरिका-भारत करारातील अनिश्चितता आणि तिसऱ्या तिमाहीच्या निकालांबद्दलच्या उच्च अपेक्षांमुळे बाजारात संमिश्र आशावाद दिसून येईल आणि तो मर्यादित कक्षेत राहण्याची शक्यता आहे.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'काल नवीन विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर बाजारात कमजोरी कायम राहिल्याने निफ्टी घसरला आहे. खालच्या पातळीवर, त्याला २६१०० पातळीच्या आसपास इंट्राडे आधार मिळाला. नजीकच्या काळात हा ट्रेंड मर्यादित श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुढे जाऊन, तेजीवाल्यांनी निफ्टीला २६३०० पातळीच्या वर नेण्याचा प्रयत्न केल्यास एक शाश्वत तेजीची लाट येऊ शकते. घसरणीच्या बाजूने, २६००० पातळीवर आधार पातळी आहे.


आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'चार्टच्या रचनेनुसार, बँक निफ्टीने दैनंदिन चार्टवर घसरत्या ट्रेंडलाइनचा ब्रेकआउट दिला आहे आणि उच्च स्तरांवर स्थिरावत आहे, तसेच तासाभराच्या टाइमफ्रेमवर आपल्या अल्प-मुदतीच्या ५० एसएमएच्या वर टिकून आहे. दैनंदिन आरएसआय (Relative Strength Index RSI)६५आसपास मजबूत स्थितीसह बुलिश क्रॉसओवर मोडमध्ये आहे जे सकारात्मक गती दर्शवते. तासाभराच्या चार्टवर, निर्देशांक आपल्या ५० एसएमएच्यावर (Simple Moving Average SMA) व्यापार करत आहे, ज्यामुळे त्याची ताकद अधिक दृढ होत आहे. जोपर्यंत निर्देशांक ५९३०० पातळीच्यावर टिकून आहे तोपर्यंत 'घसरणीवर खरेदी करा' (buy-on-dips) ही रणनीती कायम ठेवावी. तात्काळ आधार (Immediate Support) ५९८०० पातळीवर आहे, तर प्रतिकार (Resistance) ६०५०० पातळीच्या पातळीजवळ दिसून येत आहे.'


आजच्या बाजारातील रुपयांच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,' डॉलर निर्देशांकातील किरकोळ घसरण आणि अलीकडील सत्रांमध्ये परकीय गुंतवणुकीचा तुलनेने कमी बहिर्वाह यामुळे रुपया डॉलरच्या तुलनेत ११ पैशांनी मजबूत होऊन ९०.१७ रूपयांवर पोहोचला. तथापि, भूराजकीय तणाव, वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि सावध जोखीम भावना यामुळे रुपयाची वाढ मर्यादित राहिली. रुपयासाठी एकूण कल कमकुवतच आहे आणि नजीकच्या काळात चलन ८९.७५–९०.५५ या विस्तृत मर्यादेत व्यवहार करण्याची शक्यता आहे.'


उद्या गुंतवणूकदारांसाठी निफ्टी स्ट्रेटेजी काय ?


एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक नागराज शेट्टी- शुक्रवारी २६३७० पातळीच्या पातळीवर नवीन सर्वकालीन उच्चांक नोंदवल्यानंतर, गेल्या काही सत्रांमध्ये मर्यादित हालचालींदरम्यान निफ्टीमध्ये घसरण झाली. मंगळवारी कमकुवत सुरुवात झाल्यानंतर, सत्राच्या बहुतेक भागासाठी निफ्टी हळूहळू घसरत गेला. मधूनमधून आलेली किरकोळ इंट्राडे तेजी टिकू शकली नाही आणि निफ्टी घसरणीसह बंद झाला. दैनंदिन आलेखावर वरच्या आणि खालच्या छायेसह एक लहान नकारात्मक कँडल तयार झाली. तांत्रिकदृष्ट्या, ही बाजारातील हालचाल 'हाय वेव्ह' प्रकारच्या कँडल पॅटर्नची निर्मिती दर्शवते,जी बाजारातील सध्याची अस्थिरता प्रतिबिंबित करते. अलीकडे २६१००-२६२०० पातळीच्या आसपासच्या एकत्रीकरणाचा अडथळा तीव्रतेने भेदल्यानंतर, बाजाराने 'थ्रो-बॅक'मध्ये सपोर्ट पातळीकडे उलटफेर केला आहे आणि 'चेंज इन पोलॅरिटी'नुसार येथे आधार मिळण्याची अपेक्षा आहे.


निफ्टीचा मूळ कल अस्थिर हालचालींसह कमकुवत राहिला आहे. अल्पावधीत निफ्टी २६१०० पातळीच्या जवळपासच्या सपोर्टवरून उसळी घेईल अशी अपेक्षा आहे. पुढील महत्त्वाचा प्रतिरोध २६४०० पातळीवर आहे.'

Comments
Add Comment

आदिवासी तरुणीची ३ लाखांत खरेदी-विक्री

श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार, वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाडा  : तालुक्यातील गारगांव येथील एका वीस

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट

तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

पुणे : डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. सूरज मराठे

माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी

'ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर दिसलेलं दृष्य भविष्यात गिरगाव बीचवरही दिसू शकेल'

मुंबई : काही पक्ष राजकीय स्वार्थासाठी मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिले

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम