नाशिकच्या राजकारणाला कलाटणी दोन माजी महापौरांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मुंबईतील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश


नाशिक : नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभ दीप निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ झाली आहे.


यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दशरथ पाटील महापौर असताना पार पडलेल्या नाशिक कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनाचा उल्लेख करत, “कुंभमेळ्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य आयोजनाचे नियोजन, प्रशासनाशी समन्वय आणि जनतेच्या सोयीसुविधांचा अनुभव शिवसेनेसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.


दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का देत मुंबईतील मनसेचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. मनसेचे सरचिटणीस राजाभाऊ चौगुले, प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तूपलोंढे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख, जनहित कक्षाचे ॲड. देवाशीष मर्क, प्रथमेश बांदेकर आणि संतोष यादव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.


उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे शिवसेनेत स्वागत करत, “शिवसेना ही केवळ पक्ष नसून सर्वसामान्य जनतेसाठी लढणारी चळवळ आहे. नव्याने दाखल झालेले हे सर्व सहकारी संघटन मजबूत करतील आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे काम करतील,” असे सांगून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सुशांत शेलार, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, तसेच शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या सर्व नेत्यांनी यावेळी बोलताना, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विकास, निर्णयक्षमता आणि सामान्य माणसाच्या हितासाठी ठामपणे उभी आहे. हाच विश्वास आम्हाला येथे घेऊन आला,” अशी स्पष्ट भूमिका मांडली. या धडाकेबाज पक्षप्रवेशामुळे नाशिकसह मुंबईतही राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Comments
Add Comment

आदिवासी तरुणीची ३ लाखांत खरेदी-विक्री

श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार, वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाडा  : तालुक्यातील गारगांव येथील एका वीस

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट

तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

पुणे : डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. सूरज मराठे

माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी

'ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर दिसलेलं दृष्य भविष्यात गिरगाव बीचवरही दिसू शकेल'

मुंबई : काही पक्ष राजकीय स्वार्थासाठी मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिले

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम