देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

धुळे  : राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जवळपास ६८ उमेदवार बिनविरोध आल्याच्या मुद्द्यावरून राजकीय रणकंदन सुरू आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, अशा ठिकाणच्या निवडणुका रद्द करून त्या प्रभागांमध्ये नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी उबाठाप्रमुखांनी केली. तसेच निवडणूक आयोग भाजपाच्या सांगण्यानुसार काम करत असल्याचे आरोपही उद्धवसेनेकडून सातत्याने करण्यात येत आहेत. याच मुद्द्यावरून मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.


‘या वेळेला आपण सर्वांनी कमाल केली आहे. सर्वत्र निवडणुकांचे वातावरण आहे. कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पण धुळ्यात सुरुवातीलाच चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तुम्ही बिनविरोधचा चौकार लगावला आहे. धुळ्यामध्ये भाजपने चार नगरसेवक निवडून आणले आहेत. पण आपले नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यामुळे काही लोकांना मात्र मिर्ची झोंबली आहे. अब तुमको मिर्ची लगी तो मै क्या करु’, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला.


देशाच्या लोकसभेमध्ये तब्बल ३५ खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी ३३ खासदार हे काँग्रेसच्या काळात निवडून आले आहेत. खासदार जेव्हा बिनविरोध निवडून येतात तेव्हा लोकशाही जिवंत असते आणि धुळेकरांनी आमचे चार नगरसेवक बिनविरोध दिले, तर लोकशाहीचा खून झाला. असे म्हणणाऱ्यांचे डोके नेमके कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. आमची जनता आमच्यावर प्रेम करते. आम्ही जनतेचे स्वीकारतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. प्रत्येक शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले.

Comments
Add Comment

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह