मागील तीन महापालिका निवडणुकांच्या तुलनेत यंदा उमेदवारांची संख्या घटली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतिम उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्षांसह अपक्ष अशाप्रकारे एकूण १७०० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.मात्र, उमेदवारांची ही आकडेवारी मागील तीन सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत सर्वांत कमी नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत युती, महायुती आणि आघाडी झाल्याने यंदा उमेदवारांच संख्या तसेच अपक्षांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंदा १७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, मात्र मागील सन २०१७मध्ये २२१७ उमेदवार, सन २०१२मध्ये २२३२ उमेदवार आणि सन २००७च्या सार्वत्रिक निवडणुकीत २३७६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. मागील चार सार्वत्रिक निवडणुकांचा अंदाज घेतल्यास यंदाच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांचा आकडा हा कमी होण्यामागे युती, महायुती, महाविकास आघाडी हेच प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आणि भाजपा महायुती, उबाठा आणि मनसे युती, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी यामुळे तसेच यंदा निवडणूक खर्चाची मर्यादा १५ लाखांपर्यंत नेली असली तरी आता निवडणूक लढवणे पहिल्यासारखे सोपे नसल्याने सुरुवातीला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणे आणि मगे घेणे या तुलनेत अपक्षांनी यंदा मोठ्याप्रमाणात अर्ज न भरल्यामुळे हे उमेदवारांचे प्रमाण घटल्याचे बोलले जात आहे.


सन २०१७च्या निवडणुकीत यापूर्वी युतीमध्ये लढणारे भाजपा आणि शिवसेना प्रथमच स्वतंत्र तथा स्वबळावर लढले होते. त्यामुळे मागील निवडणुकीतील अपक्षांनी तसेच बंडखोरांनी अर्ज मागे घेतल्यानंतर २२७५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले होते. त्याआधी युती आणि विकास आघाडीसह इत पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत असल्याने उमेदवारांची संख्या वाढत होती. यंदा मनसे आणि उबाठा जे २२७ जागांवर स्वतंत्र लढतात, त्यांची युती झाल्याने त्यांच्या उमेदवारांची संख्या, घटली तसेच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी झाल्याने सर्वच जागा लढवणाऱ्या या पक्षाच्या जागा काही प्रमाणात विभागल्या गेल्या.तसेच भाजपाच्या बाबतीत हेच झाले आहे. शिवसेना पक्ष यंदा प्रथमच महापालिका निवडणूक लढवत आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची संख्या अधिक वाढली असली तरी युती आणि आघाडी तसेच महायुतीमध्ये लढल्याने यंदा उमेदवारांची संख्या मोठ्याप्रमाणात घटल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.



सार्वत्रिक निवडणुकीतील एकूण उमेदवाराची संख्या


सन २००७ : २३७६


सन २०१२ : २२३२


सन २०१७ : २२७५


सन २०२६ : १७००

Comments
Add Comment

तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

पुणे : डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. सूरज मराठे

माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी

'ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर दिसलेलं दृष्य भविष्यात गिरगाव बीचवरही दिसू शकेल'

मुंबई : काही पक्ष राजकीय स्वार्थासाठी मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिले

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

'ठाकरे बंधूंची भूमिका भेदभावाची, महायुतीची भूमिका बंधूभावाची'

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र आले असले तरी त्यांनी भाषिक भेदभाव आणि

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती