आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्रमांक २३ मध्ये जोरदार सामना पहायला मिळणार आहे
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २३ धंगेकर विरुध्द आंदेकर या दोघात सामना पाहायला मिळणार आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर या सुध्दा निवडणुकीच्या मैदानात उतरल्याच आपल्याला पहायला मिळनार आहे. त्यांच्या विरोधात वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर या सुध्दा निवडणुकीत उभ्या राहिल्या आहेत.पण सोनालीने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.तर या सर्व गोष्टीमुळे निवडणुक आयोगाकडे अलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आंदेकर कुटुंबाची संपत्ती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातून सोनाली आंदेकर यांच्या आर्थिक स्थितीचा सविस्तर तपशील समोर आला आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या जवळ रोख स्वरूपात ६२,१५० रुपये आहेत. बँक ठेवींमध्ये इंडियन बँकेत २३ लाख रुपये, युनियन बँकेत ९३,७४० रुपये, तसेच इंडियन बँकेतील दुसऱ्या खात्यात १० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.याशिवाय, महेश महिला पतसंस्थेत प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या चार मुदत ठेवी असून त्यांची एकूण किंमत २० लाख रुपये इतकी आहे. वाहनांमध्ये त्यांच्या नावावर एक अॅक्टिवा दुचाकी आहे. दागिन्यांच्या बाबतीत,३ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ३ लाख ९३ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या असल्याची नोंद आहे. तसेच वनराज असोसिएट्स या फर्ममध्ये त्यांनी २ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सोनाली आंदेकर यांच्या नावावर 71 लाख 71 हजार 217 रुपयांची स्थावर मालमत्ता नोंदवण्यात आली आहे. याशिवाय, त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 62,150 रुपये असल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर कुटुंबाची जंगम मालमत्ता 57 लाख 71 हजार 740 रुपये, तर स्थावर मालमत्ता 71 लाख 71 हजार 217 रुपये इतकी आहे. या दोन्हींचा मिळून विचार करता, आंदेकर कुटुंबाची एकूण मालमत्ता 1 कोटी 29 लाख 42 हजार 957 रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, प्रतिज्ञापत्रात सोनाली आंदेकर यांच्या कुटुंबात दोन मुले आणि मयत वनराज आंदेकर यांचा उल्लेख करण्यात आला आहे.याच प्रभागातील निवडणूक लढतीत आणखी एक महत्त्वाचा पैलू समोर आला असून, बंडू आंदेकर यांच्या पत्नी लक्ष्मी आंदेकर देखील निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, लक्ष्मी आंदेकर यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 1 कोटी 38 लाख 65 हजार 638 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.