पुढे काय घडलं ?
घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५२ वर्षीय पीडित व्यक्तीचे नाव राज जसुजा अस आहे आणि तो भारतीय नागरिक आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्याच्या मागच्या बाजूला जखमा होत्या. त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.
थायलंडच्या पट्टाया शहरात एक गंभीर प्रकार समोर आला आहे, जिथे भारतीय पर्यटक राज जसुजा यावर तृतीयपंथीय महिलांच्या समूहाने हल्ला केला. माहितीप्रमाणे, ही घटना २७ डिसेंबर रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजता वॉकिंग स्ट्रीटच्या समुद्रकिनाऱ्याजवळ घडली.साक्षीदार १९ वर्षीय थाई नागरिक पोंगपोल बूनचिद यांनी पोलीस आणि बचाव कर्मचाऱ्यांना सांगितले की, राज एका तृतीयपंथी सेक्स वर्करशी पैशांवरून वाद करत होता. या वादादरम्यान दोघांनी एकमेकांचा पाठलाग करत मारहाण सुरू केली.
नंतर, त्या महिलेसोबत असलेल्या तिच्या काही मैत्रिणींनीही घटनास्थळी येऊन राजवर हल्ला केला.
जखमी अवस्थेत राजला स्थानिक बचाव कर्मचाऱ्यांनी आढळून प्रथमोपचार दिला आणि नंतर रुग्णालयात दाखल केले. राजने अद्याप या घटनेबाबत सार्वजनिकपणे काहीही विधान केलेले नाही.या घटनेमुळे स्थानिक सुरक्षा आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.