चोरीसाठी शिरला, पण नशीब फिरलं! दोन दिवस भिंतीत अडकलेला चोर, VIDEO व्हायरल

चोरीसाठी चोर कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा काही अंदाज नाही. मात्र राजस्थानमध्ये चोरा सोबत असं काही घडलं की त्याला चांगलीच अद्दल घडली ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.चोरी करण्यासाठी घरात घुसण्याच्या नादात चोर थेट किचनमधील एक्झॉस्ट फॅनच्या अरुंद जागेत अडकून पडला.ही घटना राजस्थानमधील कोटा शहरात, बोरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुभाष कुमार रावत हे आपल्या पत्नीसह ३ जानेवारी रोजी खाटूश्यामजीच्या दर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून दोन चोरांनी चोरीचा कट आखला. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडण्याऐवजी त्यांनी किचनमधील एक्झॉस्ट फॅनच्या जागेतून घरात शिरण्याचा मार्ग निवडला.

मात्र हा डाव चोराच्या अंगलट आला. अरुंद जागेतून आत शिरताना एका चोराचा अंदाज चुकला आणि तो अर्धवट अवस्थेत त्या छिद्रातच अडकून पडला. कितीही प्रयत्न करूनही तो ना पूर्णपणे आत जाऊ शकला, ना बाहेर येऊ शकला.४ जानेवारीच्या रात्री घरी परतलेल्या सुभाष कुमार यांना किचनच्या खिडकीत एक व्यक्ती अडकलेली दिसली. त्यांनी तात्काळ आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. जमाव पाहताच बाहेर थांबलेला चोराचा साथीदार पळून गेला.

अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी चोराला सुरक्षितपणे बाहेर काढून ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, चोरीचा अयशस्वी प्रयत्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
Comments
Add Comment

आंध्र प्रदेशात आता ‘हम दो, हमारे तीन’!

अमरावती (वृत्तसंस्था) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.

आखातातील युद्धाने एलएनजी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण

राजस्थानमधील डॉ. अनुज अग्निहोत्री पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी टॉपर!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल शुक्रवारी (६ मार्च) जाहीर

कर्नाटकापाठोपाठ आंध्रातही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी

बंगळूरु (वृत्तसंस्था) : कर्नाटकमध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय

इंधनाचा मुबलक साठा, तरीही अफवांमुळे पेट्रोल पंपांवर रांगा!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई

कर्नाटकात लहान मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी

नवी दिल्ली: कर्नाटकात मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कर्नाटकचे