छत्रपती संभजीनगर : सध्या छत्रपती संभजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक रीलस्टार ची रील पाहून महिलांनी साडी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. साडीवर असलेल्या सवलतीमुळे महिलांची प्रचंड गर्दी झाली आहे.५ हजारांची साडी फक्त ५९९ मध्ये मिळत असल्याच समजल्यावर एकाच वेळी हजारो महिलांनी दुकानात गर्दी केली. या चेंगराचेंगरीत ३ महिला बेशुद्ध पडल्या. तर अनेक चिमूकल्यांची आईपासून ताटातुट झाली.
संभाजीनगर रोड ते त्रिमूर्ति चौकाच्या दरम्यान एक नवीन साड्यांच दुकान सुरू झालं आहे. साडीच्या दुकानदारानी ३ महिन्यापासून साडीच्या रील बनून सोशल मीडिया वर टाकल्या होत्या आणि ,त्या रीलला भुलून शहरातील वेगवेगळ्या भागातील महिला साडी खरेदीसाठी इथे आल्या होत्या. जवळपास हजारपेक्षा अनेक महिला ह्या आपल्या कुटुंबासोंबत तर कोणी आपल्या लहान मुलांना घेऊन आल्या होत्या. एवढ्या सगळ्या महिला एकत्र आल्यावर दुकानसमोर प्रचंड अशी गर्दी झाली. ५००० ची सदी केवळ ५९९ ला मिळते कळताच अनेक महिलानी दुकानात गर्दी केली. यामध्ये एका चिमूकलीची आईपासून ताटातुट झाली . परिस्थितीच गांभीर्य घेता पोलिस घटनास्थळी पोहचले . परीस्थिती हाताबाहेर जाते याचा अंदाज येताच पोलिसांनी तबडतोप दुकान बंद केल. पोलिस वेळेवर पोहचल्यामुळे मोठा अनर्थ टळला .