विपुल अमृतलाल शाह आणि सनशाईन पिक्चर्स लिमिटेड यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द केरळ स्टोरी 2’, ज्याचे अधिकृत शीर्षक ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ आहे, याच्या प्रदर्शन तारखेची अधिकृत घोषणा केली आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
ही कथा पुन्हा एकदा वास्तवातील सत्य घटनांवर आधारित असून, खऱ्या पीडितांचे आवाज, सर्वांसमोर असूनही दडपल्या गेलेल्या सत्य कथा आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकते. या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये नव्या कलाकारांची निवड करण्यात आली असून, त्यांचा अभिनय साधा, प्रामाणिक आणि भारताच्या जमिनीवरील वास्तवाशी जोडलेला आहे.
https://www.instagram.com/reel/DTHnvB0E3gX/?igsh=MWwwaWkzZ3h1cTJyNQ==
सनशाईन पिक्चर्स लिमिटेडने चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करत एक मोशन पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरवर लिहिले आहे:
त्यांनी सांगितले, ही फक्त एक कथा आहे.
त्यांनी तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला.
तिला बदनाम करण्याचाही प्रयत्न झाला.
पण सत्य थांबले नाही.
कारण काही कथा कधीच संपत नाहीत.
या वेळी कथा आणखी खोलवर जाते.
या वेळी वेदना अधिक तीव्र आहेत.
बियॉन्ड द केरळ स्टोरी
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ने संपूर्ण देशभरात मोठी चर्चा निर्माण केली होती आणि बेस्ट डायरेक्टर व बेस्ट सिनेमॅटोग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले होते. आता ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ पुन्हा एकदा अधिक प्रभावी, सशक्त आणि व्यापक कथानकासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अलीकडच्या काळातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या फ्रँचायझींपैकी एक ठरलेला हा चित्रपट प्रेक्षकांकडून जबरदस्त पाठिंबा मिळवत असून, २०२६ मधील सर्वात मोठ्या थिएटर रिलीजपैकी एक मानला जात आहे. यावेळी हा चित्रपट भारताच्या विविध भागांतील सत्य घटनांवर आधारित आहे.
विपुल अमृतलाल शाह यांच्या सनशाईन पिक्चर्स लिमिटेडच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते कामाख्या नारायण सिंग यांनी केले असून, आशीष ए. शाह यांनी या चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.