ट्रम्प यांच्याकडून भारताला करवाढीची पुन्हा धमकी

वॉशिंग्टन : अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला असल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. उत्तर कोरियाने आता थेट जपानच्या दिशेने मिसाईल डागले आहेत. या दरम्यान आता गेल्या काही दिवसांपासून कराच्याबाबतीत शांत असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला थेट सार्वजनिक भाषणात करवाढीची धमकी देत पुन्हा एकदा टॅरिफचे हत्यार उपसले आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा रशियन तेलाच्या मुद्द्यावर सहकार्य न केल्यास ५० टक्के आयात शुल्क वाढवण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी हे वक्तव्य एका सार्वजनिक भाषणात केले आहे. तर याच भाषणामध्ये दुसरीकडे ट्रम्प यांनी मोदींचे कौतुकही केले. यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे खूप चांगले माणूस आहेत. त्यांना माहीत होते की, मी रागावलेलो आहे. त्यामुळे ते माझा राग शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांनी रशियन तेलाच्या मुद्द्यावर सहकार्य न केल्यास भारतावरील आयात शुल्क आणखी वाढवले जाऊ शकते.


ऑगस्ट २०२५ मध्ये ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावले होते. भारत आणि रशिया यांच्यातील तेल व्यापाराबाबत ते नाराज होते आणि त्यांनी याचा अनेकदा उल्लेखही केला होता. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील व्यापार करार (ट्रेड डील) बराच काळ प्रलंबित राहिला होता. ट्रम्प यांची इच्छा होती की भारताने आपला संपूर्ण बाजार अमेरिकेसाठी खुला करावा तसेच दुग्धव्यवसाय आणि कृषी क्षेत्रात अमेरिकेला प्रवेश द्यावा. मात्र, भारत आपल्या भूमिकेवर
ठाम राहिला.


भारत आणि रशिया यांचे संबंध अनेक वर्षांपासून चांगले असून दोन्ही देशांमध्ये व्यापारही सुरू आहे. ट्रम्प यांची नाराजी याच कारणामुळे असल्याचे दिसून येते आणि त्यांच्या ताज्या विधानातही याचा उल्लेख आहे. दरम्यान, सध्या ट्रम्प व्हेनेझुएलामध्ये करण्यात आलेल्या एका ऑपरेशनमुळेही चर्चेत आहेत. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली असून त्यांच्याविरोधात आता न्यायालयीन कारवाईही सुरू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून

Islamabad Hospital Fire : इस्लामाबाद रुग्णालयात गायनेकोलॉजी वॉर्डला भीषण आग; अवघ्या एका बाळाला वाचवण्यात यश, १५ चिमुकल्यांचा होरपळून अंत

इस्लामाबाद : वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि संवेदनशील मनांना चटका लावून जाणाऱ्या दोन अत्यंत

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,