मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी घोषणांची चढाओढ सुरू झाली आहे. मात्र, ठाकरे गटाच्या नव्या वचननाम्यावर टीका करताना उदय सामंत यांनी 'जुन्या आश्वासनांचे काय झाले?' असा परखड सवाल उपस्थित करून नव्या राजकीय वादाला तोंड फोडले आहे.
पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे विभागाकडून दौंड–मनमाड रेल्वे मार्गावरील दौंड ते काष्टी ...
मुंबईकरांची २५ वर्षे वाया गेली?
गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरे गटाची एकहाती सत्ता आहे. तरीही मुंबईकरांना हक्काची घरे आणि मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. "आता दोन्ही ठाकरे एकत्र आले असून त्यांनी नवीन वचननामा जाहीर केला आहे, मात्र हादेखील केवळ कागदावरच राहील," असा अविश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईचा कायापालट करायचा असेल, तर महायुतीचा महापौर बसवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
"महापौर मराठीच होणार"
मराठी माणसाला मुंबईत पुन्हा सन्मानाने स्थान मिळवून देण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सामंत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या "मुंबईचा महापौर मराठीच होईल" या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. राज ठाकरे यांनीही मराठी महापौराची मागणी केल्यास त्यांना शुभेच्छा आहेत, मात्र ही जबाबदारी केवळ महायुतीचे नगरसेवक आणि महापौरच समर्थपणे पेलू शकतात, असे मत त्यांनी मांडले.
राज ठाकरेंच्या 'खंजीर' प्रकरणावर भाष्य
यावेळी उदय सामंत यांनी जुन्या राजकीय घडामोडींची आठवण करून देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "आम्ही पूर्वीच भविष्यवाणी केली होती की उद्धव ठाकरे हे मनसेला केवळ ५०-५५ जागा देऊन राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसतील आणि प्रत्यक्षात तसेच घडले," असे ते म्हणाले. या दगाफटक्यामुळे राज ठाकरेंच्या मनात आजही वेदना असतील, पण त्या ते उघडपणे बोलू शकत नाहीत, असे सूचक विधानही त्यांनी केले.