संत ज्ञानेश्वर

 डॉ. देवीदास पोटे


संत ज्ञानेश्वरांचा हा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. अवघाची संसार म्हणजे सारे विश्व मी सुखमय करीन आणि सगळीकडे आनंदाचा वर्षाव करीन असे त्यांनी म्हटले आहे. हा आनंद प्रापंचिक वा संसारी लोकांसारखा नैमित्तिक व तत्कालिक स्वरूपाचा नाही. या आनंदाची जातकुळी विशुद्ध आणि नितळ स्वरूपाची आहे. हा आनंद मुळातच निरामय असतो. त्याला दुःखाचा कुठलाही संदर्भ नसतो. दुःखाचा अभाव हे या आनंदाचे स्वरूप नसते. या अभंगात संत ज्ञानेश्वर म्हणतात 'अवघा संसार म्हणजे सारे जग मी सुखमय करीन तिन्ही लोक आनंदाच्या लहरींनी भरून टाकीन.


खांद्यावर पताका घेऊन मी पंढरपूरला जाईन आणि आपल्या माहेरच्या आप्तांना भेटेन त्यामुळे पूर्वपुण्याईचे फळ मला मिळेल. विठुरायाची गळाभेट झाल्यावर मी त्याचाच होईन. मी विठ्ठलाचा झालो, की सर्व जग आनंदमय झाले हे सत्य प्रत्यक्षात येईल. कारण सर्व सुखाचा आणि आनंदमय क्षणांचा ठेवा विठुरायाच्या चरणाशी सामावलेला आहे.'


ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रेम, करुणा या गुणांची रेशमी किनार आहे. सर्व जग सुखी व्हावे अशी त्यांनी विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली आहे. ते सर्वांची काळजी वाहतात म्हणूनच ज्ञानेश्वर ही माउली. ज्ञानसंपन्न, भक्तिसंपन्न तरीही अतिशय लीन 'माउली' या शब्दाचे सर्व सार ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटले आहे. अवघा संसार म्हणजे चराचर विश्व आनंदमय करण्याचा संकल्प हे संतपणाचे लक्षण आहे. ज्ञानदेव हे भक्त. विठ्ठल ही माउली. पंढरपूर हे माहेर. विठ्ठलाचे भाक्तिप्रेम हे आनंदाचे निधान. मग अवघे चराचर आनंदमय लहरींनी भरून जाणार यात काय संदेह ? 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति' हे ब्रीद ज्ञानदेवांनी आपल्या अंगभूत समर्पणाने आणि सहजपणाने सिद्ध केले आहे.


अवघाचि संसार सुखाचा करीन ।
अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृताचें फळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी । आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥

 

 
Comments
Add Comment

संत नामदेव

- डॉ. देवीदास पोटे पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा । करी अंगसंगा भक्ताचिया ॥१॥ भक्त

संत मीराबाई

डॉ. देवीदास पोटे हरी गुण गावत नाचूंगी हरि गुन गावत नाचूंगी ॥ अपने मंदिर मों बैठ बैठकर। गीता भागवत बाचूंगी

जैमिनी

डॉ. अनुराधा कुलकर्णी, anuradh.klkrn@gmil.com, भारतीय ऋषी महर्षी जैमिनींच्या पूर्वमीमांसा सूत्रात १२ अध्याय आहेत. जैमिनींनी

२०२५ गोंदणखुणांतून २०२६च्या नव्या पहाटेकडे

ऋतुजा केळकर, ऋतुराज ‘ऋतुभारणीच्या गोंदणावर... नव्या वर्षाचा झुलता गुलमोहर... नव्या मोगरी गंधाचा पाझर... देह

प्रपंच आणि परमार्थ

अर्चना सरोदे, मनाचा गाभारा प्रपंच करोनी परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग। तुकाराम महाराज म्हणतात, ज्या

अखिल मानवजातीचे सुख

सद्गुरू वामनराव पै, जीवन संगीत सध्या समाजामध्ये अनेक गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत. "आपल्या हातात काही