पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराला शिखरी काठ्यांची देवभेट

जेजुरी : पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो. यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर आज रविवारी दुपारी सुपा येथील खैरे व शिरापूर(ता.दौंड) येथील होलम काठीने शिखराला काठी टेकविण्याचा मान घेतला. यावेळी सात ते आठ प्रासादिक काठ्या सहभागी होत्या.यावेळी भाविकांनी जल्लोष करित भंडा-याची उधळण करीत गडावर काठीची मंदीर प्रदक्षिणा केली.पौष पौर्णिमेनिमित्त सुप्याच्या खैरे व दौंड तालुक्यातील शिरापूर येथील काठी परंपरेनुसार शिखराला काठी टेकविण्यासाठी येते. आज सकाळी वाजत गाजत काठी गडावर आली. काठीप्रमुख शहाजी खैरे व भाविक होते. दुपारी साडेबारा वाजता खैरे व होलम यांची काठी टेकविण्याचा मान पार पडला. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा घेण्यात आली.भाविकांनी भंडारा उधळून जल्लोष करित प्रदक्षिणा पुर्ण केली. तांबडे-पांढरे निशान हे या काठीची ओळख आहे. तांबडे-पांढरे वस्त्रांनी काठी सजविण्यात आली होती.गावातही अनेक ठिकाणी काठीने मानाचे कार्यक्रम घेतले. पौष पौर्णिमेला काठी आणण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. खंडोबा-म्हाळसाच्या लग्नाचा सोहळ्यानिमित्त दुस-या दिवशी काठी टेकविण्याचा मानाचा कार्यक्रम परंपरेनुसार चालत आला आहे.

Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू

धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचविणार

नांदेड : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला

अहिल्यानगरमधील खुनाचा उलगडा समोर, भाच्याने झोपेतच मामाला संपवलं; मामाच्या....

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये राहत्या घरी एका व्यक्तीचा खून झाला होता. शेवटी या घटनेचा उलगडा सुटला आहे. भाळावस्ती

लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी अचानक २० फुटांनी वाढ

पाण्याची पातळी वाढण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही नागपूर : महाराष्ट्रातील बुलढाणा येथील लोणार सरोवर पुन्हा एकदा

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

नांदेड : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ आणि २५ जानेवारी

बुलढाण्यात एसटी बसचा थरार; ब्रेक निकामी झाल्यावर चालकाने....

बुलढाणा : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे