मोहित सोमण: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखली जाणारी एचडीएफसी बँक (HDFC Bank) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर बँकेच्या व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेतील अँडव्हान्स अथवा कर्जात ९% वाढ झाल्याचे बँकेने जाहीर केले आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेच्या गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या २६२७६ अब्जावरून या डिसेंबर महिन्यात २८६३९ अब्जावर वाढ झाली आहे. तसेच बँकेच्या एकूण सरासरी ठेवीत (Average Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या २४५२८ अब्जावरून या डिसेंबरपर्यंत १२.२% वाढ झाली असून ते २७५२४ अब्जावर पोहोचल्याचे बँकेने आकडेवारीत स्पष्ट केले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, बँकेच्या मुदतठेवीत (Term Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या डिसेंबरमधील १६३५२ अब्ज रूपयांवरून या डिसेंबरपर्यंत १३.४ वाढ झाली असल्याने ते १८५३९ अब्जावर पोहोचले. बँकेच्या कासा ठेवीत (CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ९.९% वाढ झाली. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ८१७६ अब्जाच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये ८९८४ अब्जावर वाढ झाली. तर बँकेच्या एकूत मुदत ठेवीत (Term Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या डिसेंबरमधील १६३५२ अब्ज रूपयावरून १३.४% वाढ नोंदवल्याने या डिसेंबरमध्ये ठेवी १८५३९ अब्जावर पोहोचल्या आहेत.
बँकेच्या कालावधी कासा ठेवीत (Period End CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर १०.१% वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ८७२७ कोटींच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये ९६१० अब्जावर पोहोचल्या आहेत. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बँकेच्या मुदत ठेवी अंदाजे १८९८५ अब्ज होत्या, ज्या ३१ डिसेंबर २०२४ रोजीच्या १६९११ अब्जच्या तुलनेत सुमारे १२.३% वाढ नोंदवत आहेत. बँकेच्या मजबूत निकालानंतरही शेअर्समध्ये आज २.३१% घसरण झाल्याने प्रति शेअर अखेरच्या सत्रात ९७८.५० रूपयाला स्थिरावला आहे. ब्रोकरेजने बँकेच्या आर्थिक फंडांमेटलमध्ये काही प्रश्न उपस्थित केल्याने शेअरला गुंतवणूकदारांनी नकारात्मक कौल दिला. उत्कृष्ट कामगिरी असून विश्लेषकांनी शेअरच्या घसरणीमागील मुख्य कारण म्हणून कर्ज-ठेव गुणोत्तर (LDR) आहे. या तिमाहीत LDR मध्ये ५० बेसिस पॉइंट्सची वाढ होऊन ते जवळपास ९९.००% झाले आहे. गेल्या ५ दिवसात बँकेच्या शेअर्समध्ये १% तर १ वर्षात बँकेच्या शेअर्समध्ये २.४७% घसरण झाली आहे. तर संपूर्ण वर्षभरात बँकेच्या शेअर्समध्ये मात्र १४.४१% वाढ झाली असून इयर टू डेट (YTD) बेसिसवर बँकेच्या शेअर्समध्ये १.७२% घसरण झाली आहे.