मोहित सोमण: गेल्या आठवड्याच्या तुलनेत भूराजकीय घटनांना वेग आल्याने त्याचा फटका कमोडिटी बाजारातही बसला आहे. त्यामुळे दोन दिवस घसरणीकडे असलेले सोने आज पुन्हा एकदा जोरदार रिबाऊंड करत उसळले आहे. युएसकडून झालेला व्हेनेझुएलावरील कब्जा, तसेच युएस भारत यांच्यातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्यानंतर वाढलेली अस्थिरता, इराण इस्त्राईल यांच्यातील संघर्ष, व युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात झालेली कपात यामुळे सोन्यात मोठी वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १५८ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १४५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११८ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३७४० रूपये, २२ कॅरेटसाठी १२५९५ रूपये, १८ कॅरेटसाठी १०३०५ रुपयांवर पोहोचले आहेत.
प्रति तोळा किंमतीचा विचार केल्यास, २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दरात १५८० रूपये, २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा किंमतीत १४५० रूपये, तर १८ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा किंमतीत ११८० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२७४०० रूपयांवर २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १२५९५० रुपयांवर, व १८ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १०३०५० रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर १३७४० रूपये, २२ कॅरेट प्रति ग्रॅम दर १२५९५ रूपये, १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १०३०५ रूपयांवर पोहोचले आहेत.
भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात १.४९% वाढ झाल्याने दरपातळी १३७७८८ रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर आज सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात २.६४% वाढ झाली असून दुपारपर्यंत युएस गोल्ड स्पॉट दरात २.३८% वाढ झाली असून प्रति डॉलर दरपातळी ४४३२.५० प्रति औंसवर पोहोचली आहे. सोन्याच्या बाबतीत, डिसेंबरच्या अखेरीस सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, गेल्या आठवड्यात सोन्याच्या वायद्यात ४११२ रुपयांनी म्हणजेच २.९४% घसरण झाली होती.
चांदीच्या दरातही आज तुफान वाढ
चांदीच्या दरातही आज तुफान वाढ झाली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ६ रूपयाने, प्रति किलो दर थेट ६००० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४७ प्रति किलो दर २४७००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत ३.०२% वाढ झाल्याने दरपातळी २४३४५० रूपयांवर पोहोचली. भारतीय बाजारात प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम दर २४७० रूपयांवर पोहोचले असून प्रति किलो दर २४७००० रूपयांवर पोहोचले आहेत. एकूणच आठवड्यातील चांदीचे मूल्यांकन पाहता गेल्या आठवड्यात त्यात ३४७१ रुपयांची, म्हणजेच १.४५ टक्क्यांची घसरण झाली होती. काल चांदीच्या दरात स्थिरता राहिली असली तरी १ जानेवारीपासून संपूर्ण आठवड्यात मोठी चढउतार दरात सुरु आहे. एकूणच मूल्यांकन पाहता चांदीच्या प्रति किलो दरात ८००० रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीच्या दरात चढउतार पाहिल्यास मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारी डिलिव्हरीसाठीच्या सोन्याच्या वायदा (Gold Futures) भावात १५२२६ लॉट्सच्या उलाढाल झाली त्यामुळे वायद्याच्या दरपातळीत १५०९ रुपयांची म्हणजेच १.११% वाढ होऊन तो प्रति १० ग्रॅम १३७२७० रुपयांवर पोहोचली होती. याचप्रमाणे, कमोडिटी बाजारातील चांदीच्या वायदा भावातही मोठी वाढ दिसून आली. मार्च करारासाठीच्या चांदीच्या भावात १३११२ लॉट्समध्ये ६४३४ रुपयांची, म्हणजेच २.७२% वाढ झाली असून होऊन प्रति किलो दरपातळी २४२७५० रुपयांवर पोहोचली.