जगभरात कच्च्या तेलाच्या दरात सकारात्मकता तरी भारतीय तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

मोहित सोमण: मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या सकारात्मक पुरवठ्यामुळे जगभरात कच्चे तेल घसरत आहे. मात्र तरीही भारतीय तेल उत्पादन व विपणन (Marketing) कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज घसरण दिसून आली. उपलब्ध माहितीनुसार, दुपारी २.२२ वाजेपर्यंत ओएनजीसी (१.५६%), ऑईल इंडिया (२.२५%), डीप इंडस्ट्रीज (४.०४%), जिंदाल ड्रिलिंग (५.८०%), एचओईसी (१.४८%) समभागात मोठी घसरण झाली आहे.अपवाद म्हणजे जीएनआरएल (८.७२%), डोल्फिन एंटरप्राईजेस (०.९७%), ड्यूक ऑफशोअर (०.६८%) समभागात वाढ झाली आहे. पण प्रामुख्याने मुख्य फळीतील सगळ्याच शेअर्समध्ये आज गुंतवणूकदारांना फटका बसला. सुरूवातीला वाढत असलेले शेअर्स मात्र दुसऱ्या सत्रात कोसळताना पहायला मिळाले आहेत.


विश्लेषकांची युएस व्हेनेझुएला यांच्यातील संघर्षानंंतर युएसने व्हेनेझुएला देशावरील कब्जा केल्यानंतर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. युएस ऑईल रिफायनरीला देशातील प्रवेश सोपा झाल्याने युएसकडून तेलाच्या पुरवण्यात वाढ होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे सकाळी १% पेक्षा अधिक स्तरावर तेल स्वस्त झाले होते. प्रत्यक्षात भारतीय बाजारात तेलाच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे.


जगभरातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार म्हणून व्हेनेझुएलाकडे पाहिले जाते. प्रत्यक्षात अमेरिकेतील नेतृत्वाने देशावर कब्जा केल्यानंतर मोठी आर्थिक स्थित्यंतरे अपेक्षित असून व्हेनेझुएलाकडून केल्या जाणाऱ्या निर्यातीतही यांचा परिणाम होऊ शकतो असे सांगितले जाते‌ असे असताना कच्च्या तेलाच्या शेअर्समध्ये आज दबाव वाढला असून तज्ञांच्या मते व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था घसरल्यास दीर्घकालीन परिणाम म्हणून मध्यपूर्वेतील, रशिया यांच्यातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी दबाव निर्माण ह़ोऊ शकतो व अंतिमतः तेल किंमत महाग होऊ शकते. सध्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, व्हेनेझुएलाची २०% अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या व्यापार व उत्पादनावर अवलंबून आहे. याच कारणामुळे ओपेककडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात स्थिरता दिसत असली तरी कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात कपात करण्याची मागणी काही व्यापारी करत आहेत. दरम्यान ५०% कच्चे तेल रशियाकडून भारतात येत असताना भारतालाही युएस व मध्यपूर्वेतील तेलासाठी पर्याय उपलब्ध असतील‌. एकूणच ही भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा फटका बाजारात बसल्याने तेल कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.


भारतीय बाजाराबाबत भाष्य करताना ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, कच्च्या तेलाच्या किमतींवर नजीकच्या काळात होणारा परिणाम कमी असण्याची शक्यता आहे. तथापि, दर युएसकडून निर्बंध शिथिल झाल्यानंतर अमेरिकेच्या प्रमुख तेल कंपन्यांनी व्हेनेझुएलामधील उत्पादन पुन्हा सुरू केल्यास मध्यम मुदतीत कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव येऊ शकतो. विश्लेषकांनी सांगितले की, जोपर्यंत ओपेक बाजारात संतुलन राखण्यासाठी हस्तक्षेप करत नाही, तोपर्यंत २०२७-२८ मध्ये अतिरिक्त पुरवठ्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव येऊ शकतो.


याविषयी गुंतवणूक तज्ञ कंपनी जेफरीजने म्हटले आहे की, जर निर्बंध हटवले गेले, तर रिलायन्स इंडस्ट्रीजला फायदा होऊ शकतो, कारण कंपनी पूर्वी तिच्या दैनंदिन कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे २० टक्के तेल व्हेनेझुएलाच्या सरकारी तेल कंपनी पीडीव्हीएसए (PDVSA) कडून खरेदी करत होती. रिलायन्सला ब्रेंटच्या तुलनेत प्रति बॅरल ५-८ डॉलरच्या सवलतीत व्हेनेझुएलाचे कच्चे तेल मिळू शकते, ज्यामुळे तिच्या एकूण रिफायनिंग मार्जिनला आधार (Margin Supports) मिळेल. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजची जामनगर येथे देशातील सर्वात मोठी तेल रिफायनरी कंपनी आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक