मोहित सोमण:सीएसबी (Catholic Syrian Bank Limited) बँकेच्या शेअर्समध्ये आज जवळपास ५% वाढ झाली आहे. त्यामुळे आज तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर शेअर इंट्राडे उच्चांकावर (All time High) पोहोचला असून याशिवाय अप्पर सर्किटवरही पोहोचला. दुपारी १२ वाजेपर्यंत बँकेच्या शेअर्समध्ये ५.०५% वाढ झाल्याने प्रति शेअर ५०७.५५ रूपयांवर व्यवहार करत आहे. बँकेच्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या तिमाहीतील आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण ठेवीत (Total Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) डिसेंबरपर्यंत २१% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये ३३४०७ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ४०४६० कोटींवर वाढ नोंदवली गेली. कासा ठेवीत (CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ३% वाढ नोंदवल्याचे स्पष्ट झाले. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ८०४२ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ८३१६ कोटीवर वाढ नोंदवली.
आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण मुदत ठेवीत (Term Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर २७% वाढ नोंदवली गेली. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या २५४३६५ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ३२१४४ कोटींवर बँकेने वाढ नोंदवली आहे. सोने अथवा संबंधित वस्तू तारण कर्जात इयर ऑन इयर बेसिसवर ४६% वाढ झाल्याचे बँकेने स्पष्ट केले. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या १३०१८ कोटींच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये १९०२३ कोटींवर वाढ नोंदवली गेली आहे. बँकेच्या स्थूल आगाऊ ठेवीत (Gross Advances) इयर ऑन इयर बेसिसवर २९% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या २८९१५ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ३७२०८ कोटीवर वाढ नोंदवली आहे.
गेल्या पाच दिवसांत बँकेच्या शेअर्समध्ये १८.४१% वाढ झाली असून गेल्या १ महिन्यात बँकेच्या शेअर्समध्ये ३१.४७% वाढ झाली आहे तर संपूर्ण वर्षभरात ६२.९५% व इयर टू डेट बेसिसवर (YTD) ११.६२% वाढ झाली. तत्पूर्वी २ जानेवारीला निकालानंतर बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने शेअर अप्पर सर्किटवर (52 Week High) पातळीवर पोहोचला होता. त्यादिवशी सीएसबी बँक लिमिटेडने ५-दिवस २०-दिवस, ५०-दिवस, १००-दिवस आणि २००-दिवसांचा अंकासह दैनंदिन एमवीए (Daily Moving Average DMA) मूव्हिंग सरासरीपेक्षा चार्टवर व्यापार करत असल्याचे स्पष्ट झाले होते. ही तांत्रिक स्थिती गेल्या वर्षभरात स्टॉकच्या मार्गावर एक मजबूत वरचा कल (Upside) आणि गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवते. त्या दिवशी त्याच्या क्षेत्राने ०.७४% ने कमी कामगिरी केली असली तरी शेअरची बुलिग कामगिरी व एकूण गती मजबूत राहिली होती.