'उद्धव ठाकरे आधी आमदारकीचा राजीनामा द्या मग बिनविरोधवर बोला'

मुंबई : जे उध्दव ठाकरे स्वतः १४ मे २०२० ला बिनविरोध निवडून आले, तेच उध्दव ठाकरे आज सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या निवडीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत आहेत. आधी तुम्ही राजीनामा द्या, मगच बिनविरोध निवडीवर बोला, असा टोला भाजपाचे मुंबई निवडणूक प्रभारी आणि मंत्री आशिष शेलार यांनी आज येथे केले.


मागाठाणे येथील वार्ड क्रमांक तीन चे महायुतीचे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना मंत्री अशी शेलार यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी आमदार प्रविण दरेकर, संजय उपाध्याय माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.


मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आता रंग भरत असून आज रविवार मुंबईकरांसाठी प्रचारवार ठरला. भाजपाचे मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभारी मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ही झंझावाती दौरा करीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला.


या दौऱ्याची सुरुवात वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ९४ येथून झाली. येथे महायुतीच्या उमेदवार पल्लवी सरमळकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले, यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.


त्या नंतर वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्र. १०१ मध्ये महायुतीच्या उमेदवार अनुश्री घोडके यांच्या प्रचारार्थ पदयात्रेदरम्यान मंत्री आशिष शेलार यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न जाणून घेतले.


वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सविस्तर संवाद साधला. यावेळी वांद्रे पश्चिममधील महायुतीच्या सहाही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी प्रचाराची दिशा, सभांचे नियोजन, बूथनिहाय तयारी आणि जनसंपर्क अधिक प्रभावी कसा करता येईल याबाबत ॲड. आशिष शेलार यांनी मार्गदर्शन केले.


दरम्यान, बोरिवली पश्चिम विधानसभा क्षेत्रातही मंत्री आशिष शेलार यांनी येथील सर्व उमेदवारांची बैठक घेतली. तर संध्याकाळी ठाणे घोडबंदर रोड परिसरात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार त्यांनी केला.

Comments
Add Comment

राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होत नसल्याने आता ते शाखा भेटींवर भर - चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला; मुंबईसह राज्यातील जनता विकासाच्या मागे

मुंबई : “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना आता गर्दी होत नसल्याने ते शाखांना भेटी देत फिरत आहेत”, अशी बोचरी

मनसे शिष्टमंडळाच्या भेटीनंतर निवडणूक आयुक्तांनी मागवला ‘बिनविरोध’ निवडीचा अहवाल - उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल; आयुक्तांकडे अविनाश जाधव यांनी सादर केले पुरावे

मुंबई : राज्यातील १० महानगरपालिकांमध्ये तब्बल ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने, या प्रक्रियेला आक्षेप घेत

एसटीच्या ताफ्यात ८ हजार नवीन बसेस वर्षाअखेरपर्यंत दाखल करा.... त्यासाठी निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास कठोर कारवाई..! — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड दम

मुंबई : सन २०२६ अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ८ हजार नवीन बसेस दाखल होतील अशा

Gold Silver Rate: युएस व्हेनेझुएलासह 'या' ४ कारणांमुळे सोने चांदी जोरदार 'रिबाऊंड' एका सत्रात सोने १.४९% व चांदी ३.४९% उसळली

मोहित सोमण: गेल्या आठवड्याच्या तुलनेत भूराजकीय घटनांना वेग आल्याने त्याचा फटका कमोडिटी बाजारातही बसला आहे.

Prasad Lad : "नारायण राणे कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत, ते आमची ऊर्जा!" प्रसाद लाड यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर त्यांचे निकटवर्तीय आणि भाजप

जगभरात कच्च्या तेलाच्या दरात सकारात्मकता तरी भारतीय तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

मोहित सोमण: मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या सकारात्मक पुरवठ्यामुळे जगभरात कच्चे तेल घसरत आहे. मात्र तरीही