नाशिकमध्ये राजकीय उलथापालथ; नाशिकच्या सुजाता डेरेंचा भाजपात प्रवेश

मुंबई : मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच नाशिकमधील राजकारणात भाजपने मोठी खेळी खेळल्याचं चित्र आहे. मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असून या पक्षप्रवेशामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. सुजाता डेरे यांच्या निर्णयामुळे मनसेला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.


महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजाता डेरे यांनी नाशिकमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मनसेकडून अधिकृत एबी फॉर्म मिळाल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर त्यांच्या भाजप प्रवेशामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


दरम्यान, मनसेने नाशिकमधील महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून विविध प्रभागांतील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील ड आरक्षणातून कोंबडे सुदाम विश्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग १ अ मधून गांगुर्डे प्रिया बाळकृष्ण, तर प्रभाग ३ ब मधून मंडलिक शितल विपुल आणि त्याच प्रभागातील ड आरक्षणातून भवर संदीप सुभाष निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग ४ मध्ये ब आरक्षणातून दौदे निकिता सागर आणि ड आरक्षणातून कुलकर्णी कविता हर्षल यांना संधी देण्यात आली आहे.


प्रभाग ५ ड मधून जाधव नवनाथ जिवराम, प्रभाग ७ अ मधून खंडाळे सत्यम चंद्रकांत, तर प्रभाग ८ मध्ये क आरक्षणातून कोरडे भाग्यश्री संतोष आणि ड-ब आरक्षणातून गुंबाडे विशाल सुरेश हे मनसेचे उमेदवार असतील. प्रभाग १० मध्ये ब आरक्षणातून जाधव किरण नामदेव आणि ड आरक्षणातून शेख फरीदा सलीम निवडणूक रिंगणात उतरले आहेत.


याशिवाय प्रभाग ११ अ मधून भावले विशाल संपत, क आरक्षणातून काळे माया आणि जाधव गीता संजय, प्रभाग १२ अ मधून तेजाळे किशोर विनायक, प्रभाग १३ ब मधून पवार मयुरी अंकुश, तर प्रभाग १६ क मधून सहाणे मिरा बाळासाहेब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग १८ ब मधून पिल्ले रोहिणी संतोष आणि प्रभाग २३ ड मधून उपासनी स्वागता रमेश यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.


प्रभाग २४ मध्ये ब-ड आरक्षणातून जगताप तुषार पुंडलिक, क आरक्षणातून रोजेकर सावित्री भिकन आणि दौदे संदीप गोपीचंद, तर प्रभाग २५ मध्ये ड-ब आरक्षणातून पाटील राहुल सुदाम निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग २६ क मधून पवार निर्मला भास्कर आणि बगडे अर्चना ज्ञानेश्वर, तर प्रभाग २७ मध्ये अ आरक्षणातून मोकळ शैला दीपक, क मधून खाडम किरण गंगाराम आणि ब मधून कोदे श्री सुधाकर तसेच वेताळ वर्षा अरुण यांना संधी देण्यात आली आहे. प्रभाग २९ मधील ड आरक्षणातून माळी नितीन जगन्नाथ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

Nashik Accident News : पिकअपची दुचाकीला भीषण धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या २७

Miss Universe India 2026 : कौतुकास्पद! केरळच्या केझिया लिझ मेजोने पटकावला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब

Miss Universe India 2026 : केरळची सौंदर्यवती केझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. 23

PUC Certificate : सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! PUC साठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सविस्तर

मुंबई :  महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार