एलआयसीची बंद पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार

मुंबई (प्रतिनिधी) : नव्या वर्षाच्या मुहूर्तावर भारतीय जीवन विमा निगमने आपल्या कोट्यवधी पॉलिसीधारकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. जर तुमची विमा पॉलिसी काही कारणास्तव बंद पडली असेल, तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी एलआयसीने २ महिन्यांचे विशेष अभियान राबवण्याची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना थकीत प्रीमियम भरून आपली सुरक्षा पुन्हा मिळवता येणार आहे.


एलआयसीचे हे विशेष अभियान १ जानेवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत चालवले जाईल. या मोहिमेत सर्व 'नॉन-लिंक्ड' पॉलिसींचा समावेश करण्यात आला आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत, पुन्हा सुरू करण्यायोग्य सर्व 'नॉन-लिंक्ड' योजनांच्या विलंब शुल्कात ३०% पर्यंत सूट दिली जाणार आहे. ही सूट जास्तीत जास्त ५ हजार रुपयेपर्यंत मर्यादित असेल. विशेष म्हणजे, मायक्रो इन्शुरन्स पॉलिसीधारकांना विलंब शुल्कात १००% सूट देऊन त्यांना पूर्ण दिलासा देण्यात आला आहे.



नियम आणि अटी


ज्या पॉलिसींचा प्रीमियम भरण्याचा कालावधी संपलेला नाही आणि ज्या पॉलिसी मॅच्युरिटीपूर्वी बंद झाल्या आहेत, त्या या मोहिमेअंतर्गत पुन्हा सुरू करता येतील. मात्र, वैद्यकीय किंवा आरोग्याशी संबंधित चाचण्यांच्या नियमांमध्ये कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. प्रतिकूल परिस्थितीमुळे जे ग्राहक वेळेवर हप्ते भरू शकले नाहीत, त्यांना आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण पुन्हा सुनिश्चित करण्यासाठी ही उत्तम संधी आहे.



दोन नवीन योजनांचे लाँचिंग


एलआयसीने डिसेंबर महिन्यात 'प्रोटेक्शन प्लस' आणि 'विमा कवच' नावाचे दोन नवीन प्लॅन देखील बाजारात आणले आहेत.
प्रोटेक्शन प्लस : हा एक मार्केट लिंक्ड सेव्हिंग्स प्लॅन असून यात गुंतवणुकीसोबतच सुरक्षेचा फायदा मिळतो. मॅच्युरिटीच्या वेळी भरलेले 'मोर्टालिटी चार्जेस' परत मिळणे हे या प्लॅनचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
विमा कवच : लग्न किंवा अपत्याचा जन्म यांसारख्या प्रसंगी विमा रक्कम वाढवण्याची सोय यात आहे. महिला आणि धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींसाठी या प्लॅनचे प्रीमियम दर कमी ठेवण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

पुरावे द्या, गैरकारभार करणाऱ्या मासेमारी संस्थांवर कारवाई करू

मुंबई : "मत्स्यव्यवसाय करणाऱ्या संस्थांमध्ये गैरप्रकार होत असल्याची तक्रार असेल, तर पुरावे द्या, संबंधित

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम

Mojtaba Khamenei : गेला खामेनी कुणीकडे ? जगभरात चर्चेला उधाण

इराणचे नव्याने नियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्याबाबत सतत नवनवीन बातम्या समोर येत आहेत. अशातच काही

Kaviya Maran : पाकिस्तानी खेळाडूच्या खरेदीनंतर सनरायझर्स अडचणीत; X अकाउंट झाले सस्पेंड

मुंबई : काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं इंग्लंड येथे होणाऱ्या द हंड्रेड २०२६ च्या

Iran-US-Israel War : इराणच्या ‘हिट लिस्ट’वर अमेरिकन टेक कंपन्या, गुगल-अमेझॉनसह मोठ्या कंपन्यांना धोका

मध्यपूर्वेत सुरू असलेला अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिक धोकादायक टप्प्यावर पोहोचत

इराणकडून अमेरिकेचे KC-135 शक्तिशाली विमान नष्ट

नवी दिल्ली: अमेरिकेला इराणकडून अत्यंत तीव्र आणि जशास तसे प्रत्युत्तर मिळत आहे. अमेरिकेने ज्या गोष्टीची कधी