संभाजीनगरात बाईक व्यवहाराचा वाद जीवावर बेतला; ७ जणांच्या टोळीकडून १७ वर्षीय विद्यार्थ्याचं सिनेस्टाईल अपहरण

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी मध्यरात्री सिनेस्टाईल अपहरणाची धक्कादायक घटना घडली आहे. स्पोर्ट्स बाईकच्या खरेदी-विक्री व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचा शेवट थेट अपहरणात झाला. बजरंग चौक परिसरात ७ जणांच्या टोळीने पाठलाग करून १७ वर्षीय बारावीतील विद्यार्थ्याला जबरदस्तीने कारमध्ये कोंबून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. मात्र, सिडको पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अवघ्या दोन तासांत विद्यार्थ्याची सुखरूप सुटका करण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपासून स्पोर्ट्स बाईकच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. शुक्रवारी मध्यरात्री विद्यार्थी बजरंग चौक परिसरात असताना दोन कारमधून आलेल्या आरोपींनी त्याला अडवले. काही कळायच्या आतच त्याला उचलून कारमध्ये टाकण्यात आले आणि आरोपींनी घटनास्थळावरून धूम ठोकली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.


घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. कंट्रोल रूमच्या मदतीने शहरभर नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या कारचा माग घेत वाळूज परिसरापर्यंत थरारक पाठलाग केला. अखेर दोन तासांच्या आत पोलिसांनी कार अडवून विद्यार्थ्याची सुखरूप सुटका केली.


या प्रकरणी विवेक गणेश सोनवणे, पांडुरंग माधवराव सोनवणे आणि रोहन सुनील ढवळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर तिन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, या गुन्ह्यात सामील असलेले इतर चार आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक

अशोक खरातने सहा महिने..., आणखी एका तरुणीचा खळबळजनक आरोप

नाशिक: महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात

कर्नाटकात खळबळ, माजी आमदाराच्या मुलाची हत्या; जळालेल्या कारमध्ये...

धारवाड: कर्नाटकच्या धारवाडजवळील एका निर्जनस्थळी जळालेल्या कारमध्ये कोळसा झालेला मृतदेह सापडल्याने हत्येचा

Ashok Kharat: न्यायालयात बोलताना जादुटोणाबाबत काय म्हणाला अशोक खरात?

मुंबई: महिलांवर लैंगिक अत्याचार आणि तंत्र-मंत्राचा वापर करीत अमानुष अत्याचार करणाऱ्या अशोक खरात याला

खरातच्या काळ्या कारनाम्याचा छडा आयपीएस तेजस्वी सातपुते लावणार, कोण आहेत आयपीएस तेजस्वी सातपुते?

नाशिक: महाराष्ट्रातील भोंदूबाबा म्हणजेच अशोक खरातचं काळं सत्य आता हळूहळू समोर येत आहे. स्वत:ला कॅप्टन आणि

नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, पतीकडून उकळले १० लाख रुपये; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

मुंबई: डोंबिवलीतून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रहिम पद्मसी,करीम जैन आणि करण जोशी अशा तीन नावांचा वापर