मुंबई: सेबीने 'इज ऑफ डुईंग बिझनेस' सह घोटाळ्याविरोधात कडक कायदे व कडक अनुपालन (Compliance) लागू करत असताना आणखी सायबर सुरक्षेसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. याविषयी बोलताना सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी सांगितले आहे की, 'सेबीने नियमन केलेल्या संस्थांच्या सायबर सुरक्षेच्या तयारीचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधन विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे. बीएसईमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पांडे यांनी सेबी बाजार पायाभूत सुविधा संस्थांसाठी (MIIs) तंत्रज्ञान रोडमॅप विकसित करण्यासाठी एक कार्यगट स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे असे म्हटले.
याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले आहेत की,'नियमन केलेल्या संस्थांच्या जोखीमेवर अवलंबून असलेल्या पर्यवेक्षणाला बळकटी देण्यासाठी एआय आधारित तपासणी साधन सध्या विकसित केले जात आहे असे पांडे यांनी सर्वात सेन्सेक्सच्या ४० व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना यानिमित्ताने स्पष्ट केले. सध्या मोठ्या प्रमाणात सायबर सुरक्षेचा प्रश्न भेडसावत असताना पुढे पांडे यांनी विकसित केले जाणारे हे साधन सायबर ऑडिट अहवालांचे विश्लेषण करेल नियंत्रणातील त्रुटी ओळखेल आणि संस्थांना त्यांच्या जोखमीच्या पातळीनुसार वर्गीकृत करेल असे सांगितले. तंत्रज्ञान रोडमॅप MIIs ला सिक्युरिटीज मार्केट इकोसिस्टमसाठी एक संरचित पाच वर्षांची आणि १० वर्षांची धोरणात्मक तंत्रज्ञान दृष्टी (Technical Outlook) प्रदान करेल,असे पांडे यांनी पुढे म्हटले.
त्यांनी एक्सचेंज आणि इतर MIIs (Market Infrastructure Institutions) ना तंत्रज्ञान, जोखीम व्यवस्थापन आणि सायबर लवचिकतेमध्ये गुंतवणूक सुरू ठेवण्याचे आवाहन केले.'आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की नावीन्यपूर्णता बाजाराची अखंडता कमकुवत नाही, तर मजबूत करते' असे ते म्हणाले.
गुंतवणूकदार वर्गातील वाढता सहभाग (Participation) आणि विविधीकरण (Diversification) या पार्श्वभूमीवर सेबी बाजाराची अखंडता टिकवून ठेवणाऱ्या नियामक रचनेला बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असे ते म्हणाले. 'दीर्घकाळ टिकणारे बाजार क्षणिक तेजी किंवा आशावादाच्या चक्रांवर तयार होत नाहीत. ते अशा संस्थांवर तयार होतात ज्या विश्वास निर्माण करतात, बाजारासोबत विकसित होणारे नियमन आणि सतत जुळवून घेणाऱ्या व अद्ययावत होणाऱ्या प्रणालींवर आधारित असतात' असे सेबी प्रमुख पांडे यांनी कार्यक्रमात बोलताना सूचित विधान केले आहे.