RBI Forex Reserves: परकीय चलन संकलनात ३.२९ अब्ज डॉलरने वाढ

मोहित सोमण: आरबीआयने (Reserve Bank of India RBI) या आठवड्यातील परकीय चलन संकलनाची आकडेवारी घोषित केली आहे. आपल्या विकली बुलेटिनमध्ये आरबीआयने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यातील परकीय चलनात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३.२९ अब्ज डॉलरने वाढ होत चलन ६९६.६१ अब्ज डॉलरवर पोहोचले असल्याचे म्हटले गेले आहे. तत्पूर्वी परकीय चलन ४.३६ अब्ज डॉलरने वाढत २६ डिसेंबरपर्यंत ६९३.३२ अब्ज डॉलरवर पोहोचले होते. आकडेवारीनुसार परकीय चलन मालमत्तेत (Foreign Currency Assets FCA) इयर ऑन इयर बेसिसवर २६ डिसेंबरपर्यंत आठवड्यात १८४ दशलक्ष डॉलर्सने वाढ झाली असून ते ५५९.६१ अब्ज डॉलरवर पोहोचले असल्याचे आरबीआयने आकडेवारीत नमूद केले आहे.


एसडीआर (Special Drawings Right) गेल्या आठवड्यात (२६ डिसेंबरपर्यंत) इयर ऑन इयर बेसिसवर ६० दशलक्ष डॉलर्सने वाढ झाली असून १८.८० अब्ज डॉलरवर वाढ नोंदवली आहे. सोन्याच्या बाबतीत गेल्या आठवड्यातील सोने संकलनात (Gold Reserves) इयर ऑन इयर बेसिसवर २.९६ अब्ज डॉलरने वाढ झाली असून ती ११३.३२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आयएमएफ (International Monetary Fund IMF) कडे असलेल्या रिव्हर्स पोझिशनमध्ये ९३ दशलक्ष डॉलर्सने वाढ झाली असून ४.८८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.


देशाच्या व्यापारी स्थितीसह चलनाची हालचाल आरबीआय वेळोवळी ओपन मार्केट ऑपरेशनमधून नियंत्रित करत असते. गेल्या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रूपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी आरबीआयकडून आक्रमक पद्धतीने डॉलरची विक्री झाली होती. परंतु या आठवड्यात भूराजकीय अस्थिरतेचा चलनी बाजारात फटका बसला. दरम्यान भारतीय बाजारातील गुंतवणूक वाढल्याने रूपयांचे गेल्या आठवड्यात दर काही प्रमाणात नियंत्रित राहिले परिणामी आरबीआयने मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची खरेदी करत मूल्यांकन राखले. संबंधित आकडेवारी २६ डिसेंबरपर्यंत दर्शविली आहे.


आरबीआय वेळोवळी परकीय चलन बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवते आणि बाजारातील परिस्थिती सुव्यवस्थित राहावी यासाठी आवश्यकतेनुसार हस्तक्षेप करते. हे हस्तक्षेप रुपयामधील अतिरिक्त अस्थिरता रोखण्याच्या उद्देशाने केले जातात आणि ते कोणत्याही पूर्वनिर्धारित विनिमय दराच्या पातळीशी किंवा मर्यादेशी जोडलेले नसतात.

Comments
Add Comment

मादुरो यांना तातडीने सोडा, अन्यथा महायुद्ध

नवी दिल्ली : अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना

US attack on Venezuela : हातात बेड्या, डोळ्यावर पट्टी बांधून राष्ट्राध्यक्षाला आणलं उचलून, ट्रम्प यांच्याकडून Photo जारी

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केला आहे, ज्याने संपूर्ण

आपापसात सेटिंग करू नका, रविंद्र चव्हाणांचा इशारा

पिंपरी चिंचवड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शहरातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या

Devendra Fadanvis : मुंबईत महायुतीचा 'महाविजय' होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा एल्गार!

१६ जानेवारीला मुंबईत महाविजय साजरा करणार! 'मुंबईचा महापौर हिंदूच आणि मराठीच होणार' बुरखेवाली नाही, तर मराठीच

Eknath Shinde : मुंबईत महायुतीची ललकारी! ६८ नगरसेवक बिनविरोध! ही विजयाची नांदी; शिंदेंनी फुंकले मुंबईत प्रचाराचे रणशिंग

"हा शुभारंभ नव्हे, विजयाची नांदी!" ६८ बिनविरोध जागांवरून एकनाथ शिंदेंचा हुंकार मुंबईचा महापौर 'मराठीच' होणार!

२९ महापालिकांमध्ये ३५.७ टक्के बंडखोरांची माघार

राज्यातील ८९३ प्रभागांत १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात; मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक स्पर्धा मुंबई : राज्यात