IDBI Bank: कालच्या बँकेच्या शेअर्समधील तुफानीनंतर व्यवसायिक आकडेवारी जाहीर यंदा व्यवसायात १२% वाढ

मोहित सोमण: आयडीबीआय बँकेने (IDBI Bank) व्यवसायिक आकडेवारी जाहीर केली आहे. आयडीबीआय बँकेच्या प्रोव्हिजनल आकडेवारीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) बँकेच्या एकूण व्यवसायात १२% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील ४८९२४५ कोटींच्या तुलनेत या वर्षात ५४६६३४ कोटींवर वाढ झाली आहे. एकूण ठेवीत (Total Deposit) इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबर २२०४ मधील २८२४३९ कोटींच्या तुलनेत या डिसेंबरपर्यंत ९% वाढ झाली असून ठेवी ३०७८२८ कोटींवर पोहोचल्या आहेत. कासा ठेवीत (CASA Deposits) करंट व सेविंग अकाऊंट गुणोत्तर ठेवीत इयर ऑन इयर बेसिसवर ४% वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये १३०८९९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १३५६३० कोटींवर वाढ झाली आहे. अँडव्हान्स ठेवीत इयर ऑन इयर बेसिसवर १५% वाढ झाल्याचेही बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये नमूद केले. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील २०६८०७ कोटींच्या तुलनेत या डिसेंबर महिन्यापर्यंत २३८८०६ कोटींवर वाढ नोंदवली आहे.


चौथ्या तिमाहीत बँकेला इयर ऑन इयर बेसिसवर तिसऱ्या तिमाहीतील १४८०.८१ कोटींच्या तुलनेत १९२९.०९ कोटींवर वाढ एकत्रित निव्वळ नफ्यात (Consolidated Net Profit) वाढ झाली आहे. एकूण उत्पन्नात तेव्हा १३.८४% वाढ झाली होती. तर बँकेच्या एकूण व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) इयर ऑन इयर बेसिसवर १९.४% वाढ झाली होती. काल आयडीबीआय बँकेच्या शेअर्समध्ये १०.४५% तुफान वाढ झाल्याने बँकेचा शेअर ११४.६० रूपये प्रति शेअरवर पोहोचला होता. तर गेल्या ५ दिवसात बँकेच्या शेअर्समध्ये १२.९६% वाढ झाली असून गेल्या एक महिन्यात बँकेच्या शेअरमध्ये १७.३६% वाढ झाली आहे तर एक वर्षात बँकेच्या शेअर्समध्ये ४७.८३% वाढ नोंदवली गेली आहे. इयर टू डेट बेसिसवर (YTD) बँकेच्या शेअर्समध्ये ११.४८% वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

Transportation Guidelines : विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारची नवी नियमावली;उल्लंघन करणाऱ्या चालकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा सुवर्ण जलवा! ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत हॅट्रिक, पंतप्रधान मोदींसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टिंगची स्टार खेळाडू मीराबाई चानूने (Mirabai Chanu) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ग्लासगो येथे

Nashik Accident News : नवविवाहित दाम्पत्याचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात भीषण रस्ता अपघातात नवविवाहित पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा

IND vs ZIM T20 : 'बेबी बॉस' वैभव सूर्यवंशीचा जलवा; झिम्बाब्वेला क्लिन स्वीप देत टीम इंडियाचा दणदणीत विजय

हरारे: भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत शानदार कामगिरी करत यजमान संघाला व्हाईटवॉश

Gold - Silver Rate : सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात किंचित घसरण

नवी दिल्ली : देशांतर्गत सराफा बाजारात आज सकाळच्या सत्रात किंचित घसरण दिसून आली. किमतीतील घसरणीमुळे, देशभरातील