बस पेटल्याने समृद्धी महामार्गावर चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर वैजापूरहून, मुंबईहून येणाऱ्या दिशेच्या मार्गावर ट्रॅकची बसला धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसमध्ये चालकासह ३२ जण प्रवास करीत होते, त्यातील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. साईराम ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस मुंबईहून बुलढाण्याच्या दिशेने जात असताना पहाटे ३.३० च्या सुमारास ट्रकची धडक लागताच बसला आग लागली, सर्व प्रवाशांनी बसमधून तातडीने बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. चालक आतच गुदमरून गेल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.



ओव्हरटेक करताना ट्रकला धडक, ट्रकसह बसही पेटली


अपघातात २१ जण किरकोळ जखमी आहेत, त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला त्यावेळी सर्व प्रवासी झोपलेले होते, अचानक आग लागल्याने आपत्कालीन दरवाजा उघडून, तर काही लोकांनी काचा फोडून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. बसची ट्रकला जबर धडक बसल्याने चालक अडकला होता. त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. सदरील बस लेन क्रमांक दोनमधून तीनवर जात असताना, ओव्हरटेक करत असताना धडक बसल्याने बससह ट्रकने पेट घेतला होता. सदरील वाहनांमधील आग विझववण्यात आली, पुढील तपासाची माहिती शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश काळे यांनी दिली.

Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू

धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचविणार

नांदेड : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला

अहिल्यानगरमधील खुनाचा उलगडा समोर, भाच्याने झोपेतच मामाला संपवलं; मामाच्या....

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये राहत्या घरी एका व्यक्तीचा खून झाला होता. शेवटी या घटनेचा उलगडा सुटला आहे. भाळावस्ती

लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी अचानक २० फुटांनी वाढ

पाण्याची पातळी वाढण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही नागपूर : महाराष्ट्रातील बुलढाणा येथील लोणार सरोवर पुन्हा एकदा

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

नांदेड : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ आणि २५ जानेवारी

बुलढाण्यात एसटी बसचा थरार; ब्रेक निकामी झाल्यावर चालकाने....

बुलढाणा : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे