अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी पहिल्यांदाच एकत्र, ‘ओह माय गॉड ३' मध्ये प्रमुख भूमिका

मुंबई: २०२६ मध्ये अभिनेता अक्षय कुमार विविध मोठ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जॉली एलएलबी’, ‘हाऊसफुल ५’ आणि ‘केसरी चॅप्टर ५’ या सिक्वेल चित्रपटांसह तो ‘वेलकम टू द जंगल’मधून प्रेक्षकांना हसवणार आहे. अक्षय कुमारच्या आणखी एका बहुप्रतिक्षित चित्रपटाची चर्चा सुरू झाली असून, तो पुन्हा एकदा लोकप्रिय फ्रँचायझीचा भाग होणार आहे.


अक्षय कुमार ‘ओह माय गॉड ३’ च्या तिसऱ्या भागात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून अभिनेत्री राणी मुखर्जी पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत रूपेरी पडद्यावर झळकणार असल्याची माहिती आहे. दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ‘ओह माय गॉड 3’च्या कथानकासाठी अमित राय यांनी पटकथा लिहिली असून, मागील दोन्ही भागांपेक्षा हा भाग अधिक भव्य, सध्याच्या घडामोडींशी संबंधित आणि प्रभावी असेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. पहिल्या दोन भागांच्या यशानंतर अक्षय कुमार पुन्हा या फ्रँचायझीचा भाग बनत आहे.


या तिसऱ्या भागात अक्षय कुमारसोबत राणी मुखर्जी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार असल्याने चित्रपटाबाबतची चर्चा आणखी वाढली आहे. सध्या चित्रपटाचं प्री-प्रॉडक्शन सुरू असून, लवकरच शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


‘ओह माय गॉड’चा पहिला भाग २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. अवघ्या २० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात १४९.९० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या भागाने ६० कोटींच्या बजेटमध्ये २२१.५७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आता तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

लग्नाच्या दहा दिवसांतच मोठा धक्का; हनिमूनऐवजी जेलवारी, मराठी बिग बॉस फेम जय दुधाणेला अटक

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणेला ठाणे

पुन्हा एकदा पोट धरून हसवणार; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नव्या सीझनसह सज्ज

मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात हास्य आणि आनंदाने करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम म्हणजेच

आशियाई चित्रपट महोत्सवात बहुचर्चित ‘मयसभा’

मुंबई : चित्रपटप्रेमींचं लक्ष लागून राहणाऱ्या २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला मुंबईमध्ये शुक्रवार ९

एन् डी स्टुडिओत 'कार्निव्हल'

कर्जत : नितीन देसाई यांनी २००५ मध्ये मुंबईजवळच्या कर्जत इथे एनडी स्टुडिओची निर्मिती केली होती. ५२ एकरवर हा एनडी

गुवाहाटीत मध्यरात्री झालेल्या अपघातात अभिनेता आशिष विद्यार्थी आणि पत्नी जखमी

गुवाहाटी: बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रुपाली बरुआ हे शुक्रवारी रात्री गुवाहाटीतील झू रोड

कोकणातलो बाबूली मेस्त्री गाजवणार ऑस्कर; दशावतार सिनेमाची ऑस्करसाठी निवड

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ... . २०२५ मध्ये प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळवणारा ‘दशावतार’ हा