मोहित सोमण: अदानी समुहाने १०००० कोटींची गुंतवणूक एनसीडी (Non Convertible Debentures NCD) मार्फत उभी करण्याचे एक्सचेंज फायलिंगमध्ये जाहीर केले आहे. नव्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांना किमान १० डिबेंचरचा 'लॉट' खरेदी करावा लागेल. म्हणजेच गुंतवणूकदारांना किमान १०००० रूपयांची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली आहे. ५ लाख एनसीडीचा हा संच असून ६ जानेवारी ते १९ जानेवारी २०२६ दरम्यान गुंतवणूकदारांसाठी एनसीडी खरेदीसाठी उपलब्ध असतील असे अदानी समुहाने स्पष्ट केले आहे.
उपलब्ध माहितीनुसार Nuvama Wealth Management, Trust Investment Advisors Private Limited, Tipsons Consultancy Services Private Limited या कंपन्या बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहेत. रजिस्ट्रार म्हणून MUFG Intime India Pvt Ltd कंपनी काम करेल. प्रत्येकी १००० रुपये दर्शनी मूल्याचे (Face Value) सुरक्षित, परतफेडीयोग्य, अपरिवर्तनीय डिबेंचर्स (NSD किंवा Debentures) ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या तिकीट साईज रकमेसाठी आणि ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या ग्रीन शू पर्यायासह, एकूण १००००००० एनसीडीसाठी गुंतवणूक उपलब्ध असणार आहे असे कंपनीने स्पष्ट केले. एकूण १००० कोटी रुपयांचा हा इश्यू असणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या निधीचा वापर कंपनीच्या दैनंदिन कामकाजासाठी, तसेच थकित देयीसाठी, अँडव्हान्स पेमेंट रकमेसाठी व इतर कामकाजासाठी वापर करण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांना या एनसीडी मार्फत ८.९०% पर्यंत परतावा (Returns) मिळू शकतो. बीएसई (BSE), एनएसई (NSE) या दोन्ही बाजारात हे एनसीडी सूचीबद्ध होणार आहेत. कंपनीने सांगितले की, हे एनसीडी आठ वेगवेगळ्या सिरीजमध्ये २४ महिने, ३६ महिने आणि ६० महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध असतील, ज्यात त्रैमासिक, वार्षिक आणि संचयी व्याज भरण्याचे पर्याय असतील.