'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये कोरले नाव
बुलढाणा : ज्या वयात मुले अडखळत शब्द बोलू लागतात, त्याच वयात बुलढाणा जिल्ह्यातील एका चिमुकल्याने आपल्या अफाट बुद्धिमत्तेने संपूर्ण देशाला थक्क केले आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील क्षितिज विशाल बाजड या अवघ्या २ वर्ष ८ महिने वयाच्या बालकाने जगातील ७१ देशांच्या राजधानींची नावे अत्यंत वेगाने सांगून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ (India Book of Records) मध्ये आपले नाव नोंदवले आहे.
राजकोट : भारतीय क्रिकेट संघ आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी सज्ज होत आहे. या मालिकेसाठी संघ निवड होण्यापूर्वीच भारताचा स्टार ...
नदीच्या पुरासारखी बुद्धिमत्ता...
क्षितिजची स्मरणशक्ती एखाद्या संगणकापेक्षाही वेगवान असल्याचे पाहायला मिळते. त्याने जगातील ७१ देशांच्या राजधान्यांची नावे अवघ्या २ मिनिटे ३० सेकंदात अस्खलितपणे सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या या विलक्षण प्रतिभेची दखल घेत 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने त्याला अधिकृत प्रमाणपत्र, सुवर्णपदक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले आहे.
पालकांचे मार्गदर्शन आणि रंजक अभ्यास
क्षितिजमधील हे सुप्त गुण त्याचे वडील विशाल बाजड आणि आई सोनाली बाजड यांनी वेळेत ओळखले. त्याला रटाळ अभ्यासाऐवजी खेळाच्या माध्यमातून रंजक पद्धतीने माहिती देण्यास त्यांनी सुरुवात केली. क्षितिजला केवळ राजधान्याच नाही, तर जगाचा नकाशा देखील तोंडपाठ आहे. पालकांनी घेतलेली मेहनत आणि क्षितिजची एकाग्रता यामुळेच हे यश शक्य झाले आहे.
जिल्ह्याचा झेंडा देशपातळीवर
क्षितिजच्या या यशाने केवळ बाजड परिवाराचाच नव्हे, तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा मान देशपातळीवर वाढला आहे. "आमच्या मुलाने इतक्या लहान वयात जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले, याचा आम्हाला अभिमान आहे," अशी भावना त्याच्या पालकांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांकडूनही या चिमुकल्याच्या स्मरणशक्तीचे तोंडभरून कौतुक होत असून, त्याला 'बुलढाण्याचा गुगल बॉय' म्हणून ओळखले जात आहे.