४५० वर्षांची परंपरा जपणारी शिराळे गावची ‘गावपळण’सुरू

गावाबाहेरील राहुट्यांत नागरिकांनी थाटला संसार


वैभववाडी : दरवर्षी होणाऱ्या अनोख्या आणि परंपरागत गावपळणीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे गावाची गावपळण अलीकडेच सुरू झाली आहे. ग्रामदैवत श्री गांगेश्वराने कौल दिल्यानंतर शिराळे वाशीयांनी आपली गुरेढोरे, कोंबड्या, कुत्रे यांच्यासह गाव सोडत सडूरे गावच्या हद्दीत, दडोबा डोंगराच्या पायथ्याशी नैसर्गिक अधिवासात उभारलेल्या राहुट्यांत आपला संसार थाटला आहे.


वैभववाडीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले शिराळे हे स्वतंत्र महसुली गाव असून येथे मराठा व धनगर समाजाची सुमारे ८० कुटुंबे आणि ३५० लोकसंख्या आहे. षौष महिन्याच्या सुरुवातीला दरवर्षी होणारी ही गावपळण सुमारे ४५० वर्षांहून अधिक काळापासून सुरू असल्याची माहिती गावातील जाणकार वयोवृद्धांनी दिली.


सडूरे गावच्या माळरानावर तब्बल ४० राहुट्या उभारण्यात आल्या असून प्रत्येक राहुट्यांसमोर गुरांसाठी गाताड्या बांधण्यात आल्या आहेत. अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंसह आबालवृद्ध, कडक्याच्या थंडीतही या गावपळणीत उत्साहाने सहभागी झाले आहेत. गावपळणी दिवशी घरातून बाहेर पडलेला दिवस गृहित धरला जात नाही. गावपळणीनंतर पहिले तीन दिवस कोणताही ग्रामस्थ गावाकडे फिरकत नाही. या काळात गावची प्राथमिक शाळा राहुट्यांजवळील आंब्याच्या झाडाखाली भरते, तर एस.टी. बस थांबाही तिथेच असतो. पिण्यासाठी लगतच्या शुकनदी पात्रातील झऱ्याचे पाणी वापरले जाते.आजच्या धावपळीच्या युगात शहराकडे धावणाऱ्या माणसाचे निसर्गाशी असलेले नाते तुटत असताना, शिराळे गावची गावपळण माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाते घट्ट करणारी परंपरा ठरत आहे. मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून ग्रामस्थ दिवसभर गप्पागोष्टी करतात, मुले मनसोक्त खेळतात, तर रात्री भजनाच्या माध्यमातून आनंद साजरा करतात.


परतीच्या दिवशी ‘घोरपी’ उत्सव


तीन दिवसांनंतर पुन्हा ग्रामदैवत गांगेश्वराला कौल लावण्यात येणार असून, देवाचा हुकूम मिळाल्यानंतर पाच किंवा सात दिवसांनी ग्रामस्थ परत गावात दाखल होतील. गावात परतण्याच्या दिवशी रात्री ‘घोरपी’ हा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवासाठी नातेवाईक व मित्रपरिवार आवर्जून उपस्थित राहतात आणि सर्वांना महाप्रसाद दिला जातो.

Comments
Add Comment

या ब्लॉकबस्टर चित्रपटाने मोडला ६ वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड; नवीन वर्षातही कमाई सुरूच..

Avatar Fire And Ash Box Office Collection Day 14: धूरांधरलाही मागे टाकून या ब्लॉकबस्टर चित्रपटाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही तगडी कमाई

अक्षय खन्नाची रेहमान डकैतच्या भूमिकेची ऑफर ऐकल्यावरची भन्नाट प्रतिक्रिया

एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होण्यासाठी कथा जितकी दमदार असावी लागते, तितकंच त्याचं कास्टिंगसुद्धा.आदित्य धर

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीचा झेंडा फडकला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा विश्वासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी करत रत्नदुर्ग पिस्टल आणि

उद्या अवकाशात 'सुपर मून'ने उजळणार रात्र!

चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार नवी दिल्ली : नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच अर्थात उद्या ३ जानेवारी २०२६ रोजी

‘निमेसुलाईड’ पेनकिलर औषधावर केंद्र सरकारची बंदी

१०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त क्षमतेच्या गोळ्यांच्या विक्रीस मनाई नवी दिल्ली : सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा

मीरा-भाईंदरमध्ये महाविकास आघाडीत वादंग

काँग्रेस जिल्हा प्रवक्त्याचा राजीनामा; ‘निर्भय भारत आघाडी’ मैदानात भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील