मुंबई : भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या विधानाचा विपर्यास करून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात नेरेटिव्ह तयार केले जात असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या महापौर भूमिका स्पष्ट केली आहे. "मुंबईचा पुढचा महापौर महायुतीचाच, हिंदू आणि मराठीच होईल. मुंबईचे मराठीपण आणि हिंदुत्वाची संस्कृती कायम राहील, यात कोणतीही तडजोड होणार नाही", असे त्यांनी ठासून सांगितले.
मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केळवे. फडणवीस म्हणाले, "कृपाशंकर सिंह मीरा-भाईंदरमध्ये जे बोलले, ते मुंबईबाबत नव्हते. ते आमचे अधिकृत प्रवक्ते नाहीत. माध्यमांनी त्यांच्या मीरा-भाईंदरमधील विधानाला मुंबईशी जोडले. मात्र, मी पक्षाचा नेता म्हणून अधिकृतपणे सांगतो की, मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल. तो हिंदू होईल आणि मराठीच होईल."
मुख्यमंत्र्यांचे 'ऑपरेशन मनधरणी' यशस्वी; महायुतीच्या बिनविरोध उमेदवारांची संख्या पोहोचली ६४वर मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या प्रचाराचा नारळ ...
"मुंबईत पूर्वी बाहेरून मजूर यायचे, आता वेगवेगळ्या राज्यांतील लोक येतात. पण मुंबईचे 'मुंबईपण' कुणीही घालवू शकत नाही. गणेशोत्सवात पारंपरिक मराठी पद्धतीनेच उत्सव साजरा होतो. मुंबईची संस्कृती टिकवणे ही आमची जबाबदारी आहे. मुंबईची वाटचाल इकडे-तिकडे जाऊ देणार नाही." मराठी मतदारांबाबत बोलताना ते म्हणाले, "मराठी व्होटबँक दुसऱ्यांची आहे असे समजू नका. मराठी मतदार आमचे आहेत. जर मराठी माणसांनी भाजपला मतं दिली नसती, तर सलग तीन निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार इतक्या मोठ्या प्रमाणात निवडून आले नसते. भाजप हा क्रमांक एकचा पक्ष आहे. मराठी-अमराठी सगळेच आमचे मतदार आहेत. कुणीही कुठूनही आले तरी मुंबईचे मराठीपण कायम राहील", असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उबाठा प्रमुखांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका निवडणुका आल्या की उद्धवना येते मुंबई आणि मराठी माणसाची आठवण शिवसेनेचे राज्यभरात १९ ...
ठाकरे २००९ मध्ये एकत्र आले असते तर निकाल वेगळा असता
- - ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करताना फडणवीस म्हणाले, "ही युती खूप उशिरा झाली आहे. दोघांची मते संपल्यावर हे एकत्र आले आहेत. २००९ मध्ये एकत्र आले असते तर निकाल वेगळा आला असता. आता एकत्र येऊन काही फायदा नाही. दोघांच्या मतांची टक्केवारी इतकी कमी आहे की, मराठी किंवा अमराठी माणूस त्यांना मते देणार नाही. या दोघांची आम्हाला काही चिंता नाही. आम्ही निश्चितपणे जिंकू. त्यांचे प्राबल्य एकाच ठिकाणी आहे, तिथेही आमची मते हलली नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत."
- हिंदुत्व आणि मराठी अस्मितेवर बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले, "हिंदुत्व आणि मराठी वेगळे होऊ शकत नाहीत. हे बाळासाहेब ठाकरे यांनीच सांगितले आहे. प्रत्येक मराठी माणूस हिंदुत्ववादी आहे. आम्ही हिंदुत्व सोडू शकत नाही. मात्र, विकासावर बोलता येत नाही, काही दाखवायचे नसल्यामुळेच ठाकरे गट भावनिक मुद्दे पुढे करत आहे. आमची हिंदुत्वाची ठाम भूमिका आहे, पण त्यावर मते मागत नाही. आम्ही केलेला विकास आणि कामे सांगतो", असेही फडणवीस म्हणाले.