महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय, छत्रपती संभाजी महाराज समाधीसाठी अडीच एकर जमीन देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार


मुंबई : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने, पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक येथील जमीन आता समाधीस्थळसाठी उपलब्ध होणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर हा आज निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच जाहीर केले आहे. या दोन्ही स्थळांच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ५३२.५१ कोटी किमतीच्या विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.


महसूल विभागाने आज जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, के.ई.एम. रुग्णालयाची वढू बुद्रुक येथील गट नं. ४४७ आणि ४४८ मधील एकूण ०.८७ हेक्टर २० आर जमीन छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाच्या कामासाठी तात्काळ हस्तांतरित केली जाणार आहे. या बदल्यात, शासनाने के.ई.एम. रुग्णालयाला कोंढापुरी (ता. शिरूर) येथील गट नं. ६५५ मधील ०.८१ आर जमीन 'भोगवटादार वर्ग-२' म्हणून कब्जा हक्काने प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. कोंढापुरी येथील जमीन रुग्णालयाला 'विशेष बाब' म्हणून महसूलमुक्त आणि भोगवटामूल्यरहित उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जमिनीचा वापर केवळ मंजूर वैद्यकीय प्रयोजनासाठीच करणे बंधनकारक असून तीन वर्षांच्या आत तिथे काम सुरू करावे लागेल.


" धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ परिसराचा विकास व्हावा, ही सर्वांचीच अनेक वर्षांची मागणी होती. या निर्णयामुळे समाधीस्थळाच्या नियोजित विकास आराखड्याला मोठी गती मिळणार आहे. हे समाधीस्थळ त्याग व बलिदानाचे प्रतीक आहे.


चंद्रशेखर बावनकुळे महसूलमंत्री


वढू बुद्रुक येथील नियोजित विकासकामे:


धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारे अत्याधुनिक संग्रहालय आणि ऐतिहासिक संदर्भांनी समृद्ध ग्रंथालय उभारले जाणार आहे. ८२ आसन क्षमतेचे एक अत्याधुनिक सभागृह असेल, जिथे १०-डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रफित दाखवली जाईल. स्मारकाच्या परिसरात एक वैशिष्ट्यपूर्ण 'अदृश्य शिल्प'(इन्व्हिझिबल स्कल्पचर) उभारले जाणार आहे. भीमा नदीच्या काठी १२० मीटर लांबीचा घाट बांधला जाणार आहे.

Comments
Add Comment

Pune News : आधी बेडरूममध्ये CCTV लावले मग दीर आणि सासरा मिळून... नाशिकमध्ये विवाहितेवर जीवघेणा हल्ला

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे.

Pandhapur Accident: मुंबईवरुन विठुरायाच्या दर्शानासाठी रवाना झालेल्या भाविकांच्या गाडीचा भंयकर अपघात; चौघांचा दुर्दैवी मृत्यु

पंढरपूर : मुंबईहून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रवाना झालेल्या भाविकांच्या गाडीचा भंयकर अपघाताची घटना

Pune Crime : पुणे सुन्न! पहिली मुलगी अन् दुसऱ्यांदाही मुलगीच असल्याचं कळताच केला जबरदस्ती गर्भपात...सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास

पुणे : विद्यमान सरपंच सासू आणि शिक्षक पेशात असलेल्या सासर्‍यांच्या घरात एका उच्चशिक्षित इंजिनिअर विवाहितेचा

Pune Crime News : ५० तोळे सोने अन् ३५ लाख कॅश हुंडा देऊनही 'तिचा' छळ, गर्भपात केला; इंजिनिअर दीप्ती चौधरीने घेतला गळफास!

पुणे : पुण्यातील सोरतापवाडी (ता. हवेली) येथे एका २८ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरात

Mother Killed Son In Pune : वाघोली हादरली! जन्मदात्या आईनेच ११ वर्षांच्या मुलाला संपवलं; मुलीवरही सपासप हल्ला, रक्ताने माखलेलं घर पाहून पोलीसही सुन्न

पुणे : पुण्यातील वाघोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका आईनेच

प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहाला गालबोट; स्पीकर कोसळून तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

सोमवार २६ जानेवारी रोजी स्पीकर कोसळून एका तीन वर्षांच्या चिमूरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विक्रोळी