BMC Election 2026 : मुंबईत २२७ जागांसाठी १७०० उमेदवार भिडणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने उमेदवारी माघार घेण्‍याच्‍या मुदतीत म्‍हणजेच शुक्रवारी २ जानेवारी २०२६ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण ४२३ उमेदवारी अर्ज माघार घेण्‍यात आली आहे. तर, १ हजार ७०० उमेदवार निवडणूक लढविण्‍यास सज्‍ज आहेत यात ८२१ महिला आणि ८७९ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. शनिवारी ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक चिन्‍ह नेमून दिली जाणार आहेत. तसेच, शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम प्रसिद्ध केली जाणार आहे.


राज्‍य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांनी जाहीर केलेल्‍या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या कार्यक्रमानुसार, मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ ते मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजीपर्यंत एकूण ११ हजार ३९१ नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले.


नामनिर्देशनपत्र स्‍वीकारण्‍याच्‍या अंतिम दिवसापर्यंत म्‍हणजेच मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजी एकूण २ हजार ५१६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. प्राप्‍त २ हजार ५१६ नामनिर्देशनपत्रांची बुधवार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी छाननी करण्‍यात आली. १६४ नामनिर्देशन पत्रे छाननीत अवैध ठरली. तर उर्वरित २ हजार २३१ उमेदवारी अर्ज पत्रे वैध ठरले.


उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत होती. या निर्धारित कालावधीत ४५३ उमेदवारांनी अर्ज घेण्‍यात आले या माघारी अंती स्‍पष्‍ट झालेल्‍या चित्रानुसार, १ हजार ७०० उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.


शनिवार ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून उमेदवारांना निवडणूक चिन्‍ह नेमून देण्‍यात येणार आहे. चिन्‍ह वाटप पूर्ण झाल्‍यानंतर निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे.



माघार घेतलेल्‍या / निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्‍या


ए + बी + ई विभाग - १९ /९२


सी + डी विभाग - ०५ / ४४


एफ दक्षिण विभाग - २१ / ५०


जी दक्षिण विभाग - १४ / ५१


जी उत्‍तर विभाग - १८ / १०९


एफ उत्‍तर विभाग - २५ / ९३


एल विभाग - २० / ७६


एल विभाग - २४ / ७४


एम पूर्व विभाग - ४१ / १२१


एम पूर्व + एम पश्चिम - ४४ / ९७


एन विभाग ( - ३४ / ८८


एस विभाग - १५ / ७०


टी विभाग - २४ / ७९


एच पूर्व विभाग - २५/ ८७


के पूर्व + एच पश्चिम विभाग - १२ / ५८


के पश्चिम विभाग + के पूर्व - १८ / ८२


के पश्चिम विभाग - १८ / १०४


पी दक्षिण विभाग - १४ / ५६


पी पूर्व विभाग - २१ / ८१


पी उत्‍तर विभाग - ११ / ६०


आर दक्षिण विभाग - १० / ८३


आर मध्‍य विभाग - ०७ / ३५


आर उत्‍तर विभाग - १३ / ३९


एकूण – ४२३/ १७००

Comments
Add Comment

अभिनेत्री ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी

नवी दिल्ली : प्रयागराज महाकुंभमधील सर्वात मोठा धार्मिक वाद अखेर टोकाला पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य

लांजात जि.प.च्या ४ तर पं.स.च्या पाच उमेदवारांनी अर्ज मागे, जि.प. साठी ९ तर पंचायत समितीसाठी २६ उमेदवार रिंगणात

लांजा (संतोष कोत्रे) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २७ जानेवारी रोजी

सावंतवाडी तालुक्यात एक जिल्हा परिषद तर एक पंचायत समिती सदस्य बिनविरोध

शेर्ले पंचायत समिती गणातून भाजपचे महेश धुरी बिनविरोध, तालुक्यात तब्बल ४८ जणांनी अर्ज घेतले मागे सावंतवाडी :

पक्षशिस्तीचे उदाहरण : खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवींची निवडणुकीतून माघार

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनिती यशस्वी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये ४२ जागांसाठी निवडणूक; ११६ जणांची माघार, ११५ उमेदवार रिंगणात जिल्ह्यातील ८ पंचायत

राजापुरात जि.प. गटातून चार जणांची तर पंचायत समिती गणातुन १६ जणांची माघार

राजापूर : :राजापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या