एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होण्यासाठी कथा जितकी दमदार असावी लागते, तितकंच त्याचं कास्टिंगसुद्धा.आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट त्याचं जिवंत उदाहरण आहे.अक्षय खन्ना याने साकारलेल्या रहमान रेहमान डकैतची भूमिका विशेष चर्चेत आहे.त्यामध्ये अक्षयचा अभिनय, डान्स, लूक याने प्रेक्षकांच लक्ष वेधल आहे. विशेष म्हणजे खलनायकाची भूमिका साकारूनही तो लोकप्रिय ठरत आहे.‘धुरंधर’चा कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयच्या कास्टिंगचा भन्नाट किस्सा सांगितला आहे. या चित्रपटासाठी सर्व कलाकार शोधण्यासाठी त्याला जवळपास वर्षभराचा काळ लागला.
दिलेल्या मुलाखतीत मुकेशने सांगितलं की सर्वांत आधी रणवीर सिंहची हमजाच्या भूमिकेसाठी निवड झाली होती.परंतु चित्रपटात आधीच एक मोठा स्टार असल्याने अधिक स्टार मिळवणं अशक्य झालं होतं.“मुंबई फिल्म इंडस्ट्री अशाच पद्धतीने काम करते.मग दानिश पंडोर, राकेश बेदी,अक्षय खन्ना किंवा आर.माधवन असो..काहीच फरक पडत नव्हता.छोट्यातली छोटी भूमिकासुद्धा अत्यंत विचारपूर्वक निवडली गेली आहे”,असं त्याने स्पष्ट केलं.
मुकेशने खुलासा केला की चित्रपटाच्या कास्टिंगसाठी त्याच्याकडे फार मोठमोठ्या कल्पना होत्या.त्या कल्पना ऐकून दिग्दर्शक आदित्य धरलाही तो वेडा वाटला होता.सुरुवातीला निर्मात्यांनाही विश्वास बसत नव्हता की अक्षय खन्ना त्यांच्या प्रोजेक्टसाठी होकार देईल.पण मुकेश छाब्राने ती जबाबदारी स्वत:वर घेतली.जेव्हा त्याने अक्षयला पहिल्यांदा ‘धुरंधर’मधल्या रेहमान डकैतची ऑफर दिली,तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती, याविषयी त्याने पुढे सांगितलं.
“खरं सांगायचं झालं तर मी तेव्हा त्याचा ‘छावा’ चित्रपट पाहिला नव्हता.मी जेव्हा त्याला फोन केला,तेव्हा तो सर्वांत आधी माझ्यावर ओरडला की,तू वेडा झाला आहेस का? मी त्याला म्हटलं की, तू किमान एकदा तरी माझं म्हणणं ऐकून घे. त्याच्या मागे लागल्यानंतर तो अखेर दिग्दर्शक आदित्य धरला भेटायला तयार झाला. यावेळी तो स्वत:हून गाडी चालवून त्याच्या ऑफिसमध्ये गेला. मी त्याला ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं होतं. तो म्हणाला, मी इथे राहतच नाही. सांग कुठे यायचंय? तो आला आणि चार तास बसून राहिला. तो शांतपणे सर्वकाही ऐकत राहिला. मधेमधे स्मोकिंग करत होता. आम्ही संपूर्ण कथा ऐकवल्यानंतर तो म्हणाला, अरे ही कथा खूपच छान आहे. छान मित्रा, खूप मजा येईल. परंतु अक्षयच्या या प्रतिक्रियेनंतरही निर्माते पुढील काही दिवसांपर्यंत त्याला घेण्यावरून साशंक होते.अखेर जेव्हा खुद्द अक्षयने फोन केला आणि चित्रपटात काम करण्याविषयी उत्सुकता व्यक्त केली, तेव्हा सर्वकाही सुरळीत पार पडलं”, असं मुकेशने सांगितलं.