केवळ २७ माजी नगरसेवकांना नाकारले तिकीट
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने भाजपाकडून १३७ उमेदवारांच्या नावांची यादी घोषणा करण्यात आली आहे. यासर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यापैंकी भाजपाच्या दोन उमेदवारांचे अर्ज कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे बाद झाले आहे. त्यामुळे भाजपाने उमेदवारी दिलेल्या १३७मध्ये ५४ माजी नगरसेवकांना तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर २७ माजी नगरसेवकांचा पत्ता कापण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना आणि रिपाइं युतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरुन अनुक्रमे १३७ आणि ९० जागांचे वाटप झाले. आता रिपाइंला यातील काही जागा सोडण्यासाठी काहींचे अर्ज मागे घेतले जाणार आहेत. मुंबई महापालिकेत मागील सार्वत्रिक निवडणुकीत ८३ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील काहींचे पत्ते कापले गेल्याने बंडखोरी झाली आहे. परंतु मागील वेळेस निवडून आलेल्यांपैंकी २७ माजी नगरसेवकांचा पत्ता कापण्यात आला. तर ५४ माजी नगरसेवकांना आरक्षण आणि पक्षातील कामगिरी तसेच नशिबाची जोड लाभल्याने पुन्हा संधी मिळाली आहे. कामगिरी चांगली असूनही आरक्षणामुळे ज्या माजी नगरसेवकांना घरी बसावे लागणार होते,त्यातील ०९ नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन करून त्यांना पुन्हा संधी दिली आहे. याशिवाय काँग्रेसमधून रवी राजा आणि श्वेता कोरगावकर आणि उबाठाचे राजुल समीर देसाई यांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यांनाही संधी देण्यात आहे. तर काँग्रेसचे जगदीश अमिन कुट्टी, राजेंद्र नरवणकर, तसेच उबाठाचे श्रीकांत शेट्ये या माजी नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपातील उमेदवारी दिलेल्या माजी नगरसेवकांची संख्या ५६ एवढी आहे. याशिवाय सन २०१२ आणि २००७मध्ये निवडून आलेल्या माजी नगरसेवकांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपाने माजी नगरसेवकांना चांगल्याप्रकारे संधी दिलेली आहे.
भाई गिरकर यांच्या कुटुंबातील कुणालाच नाही संधी
चारकोपर विधानसभेतील प्रभाग क्रमांक २१मधून भाजपाचे ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांची पत्नी शैलजा गिरकर दहा हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. परंतु, त्यांच्या आकस्मित निधनामुळे त्याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची सुन प्रतिभा गिरकर या निवडून आल्या होत्या. पण आता या निवडणुकीत गिरकर यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याला उमेदवारी देण्यात आली नाही. तर माजी खासदार मनोज कोटक, आमदार पराग शाह, मुरजी पटेल हे आमदार बनले आहेत, तर राम बारोट, रजनी केणी
भाजपाने पुन्हा नाकारली संधी
कुणाचा आरक्षणाने प्रभाग गेला तर कुुणाला कामांमुळे प्रभाग गमवावा लागला आहे. अशाप्रकारे भाजपाच्या अनेक माजी नगरसेवकांचे पत्ते कापले आहेत. यामध्ये जगदीश ओझा, हरिष छेडा, विद्यार्थी सिंह, आसावरी पाटील, प्रविण शाह, अंजली खेडकर, बिना दोशी, प्रतीभा गिरकर, प्रियंका मोरे,सुनीता यादव, सुरेखा पाटील, सागरसिंह ठाकूर, सेजल देसाई, दक्षा पटेल, दिपक ठाकूर, रंजना पाटील, रेणू हंसराज, ज्योती अळवणी, समिता कांबळे, वैशाली पाटील, सुर्यकांत गवळी, बिंदू त्रिवेदी, कृष्णवेणी रेड्डी, नेहल शाह, मिनल पटेल, जोत्स्ना मेहता, अतुल शाह आदींना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही.