जीएसटी संकलनातून सरकारच्या तिजोरीत १.७४ लाख कोटी जमा

दरकपात असूनही डिसेंबरमध्ये मजबूत जीएसटी संकलन


नवी दिल्ली : केंद्र सरकारने डिसेंबर २०२५ मधील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. या कालावधीत जीएसटी महसूल वार्षिक आधारावर ६ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये जीएसटी संकलन १.७४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याआधी डिसेंबर २०२४ मध्ये देशाचा जीएसटी महसूल १.६४ लाख कोटी रुपयांहून अधिक होता. त्यामुळे डिसेंबर महिन्यात सरकारच्या तिजोरीत लक्षणीय भर पडल्याचे चित्र आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये जीएसटी संकलनात ६.१ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवण्यात आली. जीएसटी दरकपात करण्यात आली असतानाही हा आकडा समाधानकारक आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा महसूल १.२ टक्क्यांनी वाढून १.२२ लाख कोटी रुपये झाला. आयातीत वस्तूंमधून मिळणारा महसूल १९.७ टक्क्यांनी वाढून ५१,९७७ कोटी रुपये झाला. जीएसटी रिफंड ३१ टक्क्यांनी वाढून २८,९८० कोटी रुपये इतका झाला.


जीएसटी दरकपातीचा महसुलावर परिणाम


अहवालानुसार, २२ सप्टेंबर २०२५ पासून सुमारे ३७५ वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आले होते. यामुळे दैनंदिन वापरातील जवळपास ९९ टक्के वस्तू स्वस्त झाल्या. कंपेन्सेशन सेस आता केवळ तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांपुरताच मर्यादित ठेवण्यात आला आहे. याआधी हा सेस लक्झरी आणि ‘सिन प्रॉडक्ट्स’वरही लागू होता. तज्ज्ञांच्या मते, जीएसटी दरकपातीमुळे महसूल संकलनावर काही प्रमाणात परिणाम झाला असला, तरीही आयातीतून वाढलेले उत्पन्न आणि स्थिर देशांतर्गत व्यवहार यामुळे संकलन सकारात्मक राहिले आहे.

Comments
Add Comment

या ब्लॉकबस्टर चित्रपटाने मोडला ६ वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड; नवीन वर्षातही कमाई सुरूच..

Avatar Fire And Ash Box Office Collection Day 14: धूरांधरलाही मागे टाकून या ब्लॉकबस्टर चित्रपटाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही तगडी कमाई

अक्षय खन्नाची रेहमान डकैतच्या भूमिकेची ऑफर ऐकल्यावरची भन्नाट प्रतिक्रिया

एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होण्यासाठी कथा जितकी दमदार असावी लागते, तितकंच त्याचं कास्टिंगसुद्धा.आदित्य धर

४५० वर्षांची परंपरा जपणारी शिराळे गावची ‘गावपळण’सुरू

गावाबाहेरील राहुट्यांत नागरिकांनी थाटला संसार वैभववाडी : दरवर्षी होणाऱ्या अनोख्या आणि परंपरागत गावपळणीसाठी

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीचा झेंडा फडकला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा विश्वासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी करत रत्नदुर्ग पिस्टल आणि

उद्या अवकाशात 'सुपर मून'ने उजळणार रात्र!

चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार नवी दिल्ली : नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच अर्थात उद्या ३ जानेवारी २०२६ रोजी

‘निमेसुलाईड’ पेनकिलर औषधावर केंद्र सरकारची बंदी

१०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त क्षमतेच्या गोळ्यांच्या विक्रीस मनाई नवी दिल्ली : सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा