शेअर बाजार Closing Bell: अखेरच्या सत्रात बाजार सपाट 'या' मुळे झाला गुंतवणूकदारांचा घात?

मोहित सोमण: शेअर बाजारात आज जवळपास सपाट पातळीवर बंद झाले आहे. आज अखेरच्या सत्रात मात्र सकाळच्या सत्रातील तेजीचा अंडरकरंट घसरणीत बदलला. सेन्सेक्स ३२ अंकाने घसरला असून ८५१८८ व निफ्टी १६.९५ अंकांने वाढत २६१४६.४५ अंकाने स्थिरावला आहे. खासकरून सकाळच्या सत्रातील १% घसरलेला अस्थिरता निर्देशांक अखेरच्या सत्रात ३% पेक्षा अधिक पातळीवर घसरला असला तरीही बाजारातील इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली. क्षेत्रीय निर्देशांकातील एफएमसीजी, फार्मा, हेल्थकेअर, केमिकल्स या निर्देशांकात घसरण कायम राहिल्याने बँक निर्देशांकातील वाढीच्या आधारे सपोर्ट लेवल मिळाली असली तरी तेजीची रॅली आज रोखली गेली. दुसरीकडे बँक निर्देशांकासह ऑटो, मेटल, रियल्टी, आयटी शेअर्समध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे निर्देशांकात किरकोळ पाठबळ मिळाले असे म्हणावे लागेल.


जागतिक अस्थिरतेत रुपयात मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू आहे. याचा आजही फटका बसल्याने आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून रोख गुंतवणूक काढल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः युएस व्हेनेझुएला यांच्यातील वाद कायम असताना आशियाई बाजारात चीनच्या वाढत्या औद्योगिक उत्पादनानंतरही संमिश्रित प्रतिसाद आशियाई बाजाराने दिला होता. रूपया डॉलरच्या हालचालीसह कच्च्या तेलासह आज डॉलरच्या निर्देशांकात वाढ झाल्याने पुन्हा सोन्यात किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीच्या अस्थिरतेत भर पडताना नफा बुकिंगचा भाग म्हणून चांदीत घसरण कायम राहिली आहे. परिणामी आगामी तिमाही निकालांच्या आधारावर गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने आज बाजारात घसरण झाली आहे. बाजार पुन्हा एकदा कंसोलिडेशनमधून सावरत असल्याने याचा आणखी काही काळ परिणाम बाजारात अपेक्षित आहे. संवेदनशील निर्देशांक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एफएमसीजी शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात सेल ऑफ झाले ज्याचा मोठा फटका बाजारात बसला. लार्जकॅपमध्ये संमिश्र प्रतिसाद कायम असताना मिडकॅपने आज तुलनात्मकदृष्ट्या समाधानकारक कामगिरी केली आहे. तर स्मॉलकॅप शेअर्समध्ये तुलनेत आज घसरण झाली आहे. व्यापक निर्देशांकातील स्मॉलकॅप १००, स्मॉलकॅप २५० निर्देशांकात घसरण झाली असून मिडकॅप ५०, मिडकॅप १०० निर्देशांकात वाढ झाली आहे.


आज अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातही अनेक निर्देशांक सपाट पातळीवर राहिले आहे. सकाळच्या संमिश्र स्तरावरून सपाट पातळीवर हे बाजार घसरत असताना युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात फेड व्याजदरातील आशावादी अस्थिरतेमुळे डाऊ जोन्स वगळता एस अँड पी ५००, नासडाक बाजारात घसरण झाली आहे.


शेअर बाजारातील अखेरच्या सर्वाधिक वाढ टीआरआयएल (७.९४%), वोडाफोन आयडिया (७.८१%), अजंता फार्मा (६.१२%), फिनोलेक्स केबल्स (४.८९%), अदानी टोटल गॅस (४.८४%), आदित्य एएमसी (४.७४%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण गॉडफ्रे फिलिप्स (१७.०८%), आयटीसी (९.७१%), सीसीएल प्रोडक्ट (३.५९%), दीपक फर्टिलायझर (३.३९%), केपीआर मिल्स (३.१८%), युनायटेड स्पिरीट (२.७४%), इंटलेक्ट डिझाईन (२.३९%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक नागराज शेट्टी म्हणाले आहेत की,'बुधवारी मोठी तेजी पाहिल्यानंतर, गुरुवारी निफ्टीमध्ये मर्यादित श्रेणीत चढउतार दिसून आले आणि तो १६ अंकांनी वाढून बंद झाला. निफ्टी सकारात्मक पातळीवर उघडला, त्यानंतर तो एका विशिष्ट मर्यादेत स्थिरावला आणि हीच स्थिती संपूर्ण सत्रात कायम राहिली. दिवसाची उच्च आणि नीच पातळीमधील फरक सुमारे ८५ अंशांचा होता.


दैनंदिन आलेखावर एक लहान नकारात्मक कँडल तयार झाली आहे आणि निफ्टी सध्या २६२०० पातळीच्या पातळीजवळ खाली उतरणाऱ्या ट्रेंड लाइनवर प्रतिकार दर्शवत आहे. अलीकडेच २५८७८ पातळीवर एक नवीन उच्च तळ (higher bottom) रिव्हर्सल पॅटर्न तयार झाल्यामुळे, बाजारात आणखी वाढ होण्याची आणि १-२ सत्रांच्या स्थिरीकरणानंतर २६२०० पातळीच्या पातळीचा अडथळा निर्णायकपणे भेदण्याची अपेक्षा आहे. निफ्टीचा नजीकच्या काळातील तेजीचा कल कायम आहे. अल्पावधीत २६१००-२६२०० पातळीच्या पातळीजवळ लहान स्थिरीकरणानंतर, नजीकच्या काळात निफ्टी २६३००-२६४०० पातळीच्या पातळीकडे मोठी उसळी दाखवेल अशी अपेक्षा आहे. तात्काळ आधार २६०५० पातळीवर आहे.'


आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक दिलीप परमार म्हणाले आहेत की,'कोणत्याही मोठ्या प्रेरक घटकांच्या अभावामुळे बाजारात दिशाहीनता दिसून आल्याने भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाला. मर्यादित पुरवठा आणि सततच्या मागणीमुळे निर्माण झालेल्या कमी तरलतेमुळे या चलन जोडीवर वाढीचा दबाव आला, कारण आज प्रमुख परकीय चलन बाजारपेठांमध्ये नवीन वर्षाची सुट्टी होती. पुढील काळात, डॉलर रूपया (USDINR) अल्प-मुदतीच्या मर्यादेत व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे, ज्यामध्ये ८९.४० पातळीवर आधार (Support) आणि ९०.२६ पातळीवर प्रतिरोध (Resistance) असेल.

Comments
Add Comment

Neeraj Chopra : लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सीझनमधील सर्वोत्तम थ्रो; अवघ्या ९ सेंटीमीटरने हुकलं सुवर्णपदक

नवी मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League)

Vishakha Raut News : विशाखा राऊतांचे जात प्रमाणपत्र रद्द; सदा सरवणकर, प्रिया सरवणकरांची एकनाथ शिंदेंशी भेट

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे

BMC Coastal Committee : मुंबईतील किनारपट्टींच्या संवर्धनासाठी स्वतंत्र कोस्टल कमिटी, महापालिका सभागृहात ठराव मंजूर

चौपाट्यांच्या अस्वच्छतेवरून नगरसेवकांनी तीव्र नाराजी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या किनारप‌ट्टीचे

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

ED's swift action : ऑनलाइन गेमिंग-बेटिंग प्रकरणात ईडीची धडक कारवाई

नागपूर : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम