मुंबईत नवा विक्रम! २०२५ मध्ये १४ वर्षांतील मालमत्ता नोंदणीत सर्वाधिक वाढ

Knight Frank अहवालात स्पष्ट


मुंबई: एकीकडे मुंबईच्या बाबतीत घरांचे मूल्यांकन वाढत असल्याचे आपण पाहिले होते. आता नव्या अहवालानुसार, मुंबईत १४ वर्षांतील सर्वाधिक घरांची नोंदणी (Registration) इयर ऑन इयर बेसिसवर वाढले असल्याचे एका अहवालात स्पष्ट झाले आहे. रियल इस्टेट व्यवसायातील आघाडीची समजली जाणारी नाईट फ्रँक (Knight Frank) एजन्सीने मुंबईत १४ वर्षातील आतापर्यंतची सर्वाधिक वाढ २०२५ वर्षात झाल्याचे स्पष्ट केले. माहितीनुसार, मालमत्तेच्या नोंदणीत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) बेसिसवर २०२४ वर्षाच्या १४१२०२ तुलनेत २०२५ मध्ये १५०२३१ युनिट्समध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे. म्हणजेच आकडेवारीनुसार २०२५ मध्ये पाहिल्यास २०२४ पेक्षा १६% वाढ इयर ऑन इयर बेसिसवर झाली तर स्टॅम्प ड्युटी संकलनात इयर ऑन इयर बेसिसवर ११% वाढ झाली आहे.


नव्या बदलानुसार, एजन्सीने म्हटले आहे की नोंदणीत २०२४ पेक्षा २०२५ मध्ये ६% वाढ झाली. त्यामुळे घरांच्या मागणीत आजही मुंबईत मालमत्तेतील मागणी कायम असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. खासकरून बाजारात अनेक घरे रिकामी असतानाही घरांच्या मूल्यांकनातही वाढ झाली असतानाही अद्याप मागणी व नोंदणीतील वाढ कायम असल्याचे दिसून येत आहे. यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना नाईट फ्रँक संस्थेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर बैजल म्हणाले आहेत की,'हा टप्पा बाजाराची मूळ लवचिकता आणि खोलीचे एक मजबूत सूचक आहे, जे निरंतर अंतिम-वापरकर्त्यांच्या मागणीमुळे आणि अधिक सहाय्यक पुरवठा-बाजूच्या परिसंस्थेद्वारे प्रेरित आहे. मुद्रांक शुल्क संकलनातील वाढ प्रति युनिट व्यवहाराच्या मूल्यांमध्ये हळूहळू होत असलेली सुधारणा दर्शवते. ही मजबुती परवडणाऱ्या क्षमतेत झालेल्या महत्त्वपूर्ण सुधारणेमुळे अधिक दृढ झाली आहे जिथे मुंबईतील परवडण्याची क्षमता आता ४७% पातळीवर पोहोचली आहे. ही त्या पातळीपासून एक मोठी सुधारणा मानली जाऊ शकते जिथे एकेकाळी ईएमआय घरगुती उत्पन्नाच्या ९७% पर्यंत खर्च करत होते. हा बदल स्पष्टपणे दर्शवतो की मुंबईतील घर खरेदीदार योग्य किमतीत आणि योग्य उत्पादन पर्यायांमध्ये भांडवल गुंतवण्यास इच्छुक आणि सक्षम दोन्हीही आहेत.'


अहवालातील माहितीनुसार, २०२५ मध्ये सर्वाधिक नोंदणी मार्च महिन्यात झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जर आर्थिक वर्ष २०२३-२४ विचार केल्यास त्या वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी इयर ऑन इयर बेसिसवर १६% वाढ झाली होती. केवळ डिसेंबर महिन्याचा विचार केल्यास एकूण मालमत्तेतील नोंदणीपैकी ८०% नोंदणी ही निवासी मालमत्तेची होती.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची