भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. भारताने जपानला मागे टाकले आहे. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीन व तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी हे देश आहेत. पुढील अडीच ते तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जर्मनीला मागे टाकेल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. २०३० पर्यंत भारताचा जीडीपी म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादन (GDP – Gross Domestic Product) ७.३ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल, त्यामुळे भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज नुकतेच व्यक्त करण्यात आला आहे.


आर्थिक वर्ष २०२५-२०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ८.२ टक्क्यांनी वाढला आहे. पहिल्या तिमाहीत जीडीपी ७.८ टक्के होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत जीडीपी ७.४ टक्के होता. सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, “भारताची अर्थव्यवस्था ४.१८ ट्रिलियन डॉलरसह जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे.


पुढील अडीच ते तीन वर्षात भारताची अर्थव्यवस्था ७.३ ट्रिलियन डॉलर होऊन २०३० पर्यंत जर्मनीला मागे टाकेल.” तसेच भारताची अर्थव्यवस्था ही जगात सर्वाधिक वेगाने वाढत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.


अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून त्यानंतर चीन व जर्मनीचा क्रमांक लागतो. जागतिक अस्थिरता, युद्ध, व्यापार करारातील अडथळे व अमेरिकेकडून लावले जाणारे आयात शुल्क या पार्श्वभूमीवर भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे. जीडीपीमध्ये वाढ होण्यात देशांतर्गत खरेदीत झालेल्या वाढीचे योगदान आहे. तसेच देशात बेरोजगारी कमी होत आहे, देशातून होणारी निर्यात सातत्याने वाढत आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत