२०२५ च्या अखेरीस धमाका करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूंनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाबा महाकालचे दर्शन घेतले आहे. उज्जैन येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भारतीय महिला संघातील हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, रेणुका सिंह ठाकुर, स्नेह राणा, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी सकाळच्या विशेष भस्म आरतीत सहभाग घेतला. भल्या पहाटे विश्वविजेत्या महिला संघाला पाहून भाविकांनाही आनंद झाला. अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गतवर्षात दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच धावपट्टीवर हरवून भारतीय संघ विश्वविजेता ठरला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील महिला क्रिकेट संघाला गतवर्ष विजयाचे ठरले आहे. भारताच्या वाघीणींनी वेस्टइंडीजला २-१ आणि इंग्लंडला ३-२ अशी मात दिली. तर श्रीलंकेसोबत टी२० मालिकेत ५-० कामगिरी करत उत्कृष्ट खेळी केली. तिरुअनंतपुरममध्ये खेळताना अखेरच्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर १५ धावांनी विजय मिळवला. यामुळे तिसऱ्यांदा टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत श्रीलंकेचा दारूण पराभव झाला. भारताच्या या खेळीमुळे भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या जगभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस; निष्ठावंत कार्यकर्त्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी केले फोन मुंबई : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई ...
भारतीय संघाने एकदिवशीय सामन्यात चांगलाच दबदबा तयार केला आहे. पण वर्ष २०२६ मध्ये महिला क्रिकेट संघासमोर टी२० विश्वचषक जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. वर्ष २०२४ मधील टी२० विश्वचषकात भारतीय संघाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीतून महिला संघाला बाहेर पडावे लागले होते. या पराभवाला उत्तर देण्यासाठी महिला संघ तयारीला लागला आहे. या तयारी दरम्यान संघातील काही खेळाडूंनी बाबा महाकालचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला आहे.