मुंबईत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तब्बल ७०२ मतदान केंद्र


मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी एकूण १० हजार २३१ मतदान केंद्रे विविध प्रकारच्या इमारती व जागांमध्ये उभारण्यात येणार आहेत. त्‍यापैकी ४ हजार ३८६ मतदान केंद्रे शासकीय तथा निमशासकीय इमारतींमध्ये स्थापन करण्यात येत आहेत. यामध्ये २ हजार ३८७ मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, ८८० मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तर १ हजार ११९ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये राहणार आहेत.  तसेच, सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये एकूण ७०२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी १८१ मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, ३१२ मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तर २०९ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय खासगी इमारतींमध्ये एकूण ५ हजार १४३ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.


मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यांच्यासाठी विविध ठिकाणी मिळून एकूण १० हजार २३१ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये शाळा, महाविद्यालयांसह शासकीय / निमशासकीय इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्‍था तसेच खासगी इमारतींचा समावेश आहे. प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या, मतदारांची संख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रांची आखणी करण्‍यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली आहे.






मुंबईतील मतदारांना मतदान करण्यासाठी सात परिमंडळांतील २४ प्रशासकीय विभाग कार्यालयानुसार तसेच २३ मध्‍यवर्ती मतदान केंद्रानुसार एकूण १० हजार २३१ मतदान केंद्र निश्चित करण्‍यात आली आहेत. मतदान प्रक्रियेत कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर वीज पुरवठा, पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था, प्रसाधनगृहे, रॅम्‍प आदींची सुविधा करण्‍यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्‍याची पाहणी, पडताळणी केली आहे. मतदारांना त्‍यांची नावे शोधण्‍यासाठी मतदान केंद्रानजीक 'मतदार सहाय्य केंद्र' स्‍थापित करण्‍यात येणार आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांना माहिती देणारे फलक लावण्याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. एकंदरीतच, मतदान प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित व सोयीस्कर पार पडावी यासाठी विविध ठिकाणी आणि विविध स्वरूपाच्या जागांमध्ये मतदान केंद्रांची व्यापक व सुनियोजित व्यवस्था करण्यात आली आहे, असेही गगराणी यांनी नमूद केले.



मतदान केंद्रांची आकडेवारी लक्षात घेता, एकूण १० हजार २३१ मतदान केंद्रे विविध प्रकारच्या इमारती व जागांमध्ये उभारण्यात येणार आहेत. त्‍यापैकी ४ हजार ३८६ मतदान केंद्रे शासकीय तथा निमशासकीय इमारतींमध्ये स्थापन करण्यात येत आहेत. यामध्ये २ हजार ३८७ मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, ८८० मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तर १ हजार ११९ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये राहणार आहेत. तसेच, सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये एकूण ७०२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी १८१ मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, ३१२ मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तर २०९ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये स्थापन केली जाणार आहेत.  याशिवाय, खासगी इमारतींमध्ये एकूण ५ हजार १४३ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये २ हजार ७१० मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, १ हजार ३७८ मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तसेच १ हजार ५५ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये असतील,असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
Comments
Add Comment

अर्ज भरल्यापासून उमेदवाराला दैनंदिन खर्चाची नोंद ठेवणे बंधनकारक, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांची माहिती

मुंबई (विशेष प्रतिनिधी): उमेदवारी अर्ज सादर केल्यापासून उमेदवारांनी दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंद ठेवणे

BMC News : निवडणूक कामात गैरवर्तणूक, महापालिकेने केले अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ कामकाजात गंभीर स्वरूपाचे गैरवर्तणूक

BMC Election 2026 : भाजप-शिवसेना वरळीतून फुंकणार प्रचाराचे रणशिंग! ३ जानेवारीला भव्य सभा

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीची तोफ धडाडणार मुंबई : जागावाटप आणि बंडखोरांची मनधरणी करून झाल्यानंतर,

Navnath Ban : संजय राऊत म्हणजे ‘पोपटलाल’, त्यांना मुंबईत ‘खान’ महापौर करायचा आहे; भाजप नेते नवनाथ बन यांचा टोला

“पत्राचाळीत मराठी माणसाला कुणी देशोधडीला लावलं?” मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत आता वैयक्तिक

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो बँक बॅलेन्स तपासा! खात्यात नेमके किती हप्ते जमा झाले? पहा सरकारची नवीन वर्षाची भेट

मुंबई : राज्यभरातील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी संमिश्र

Nitesh Rane : मुंबईचा महापौर हा केवळ मराठी आणि हिंदूच होणार; मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना डिवचले

'बुरखेवाली' महापौर होण्याची भीती वाटत नाही का? मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण