कुणाचा पत्ता कापला, कुणाची बंडखोरी तर कुणाचा पक्षप्रवेश

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विविध राजकीय पक्षांनी गुप्तता पाळत अधिकृत उमेदवाराची निवड जाहीर केल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी बंडाचा पावित्रा घेतला. कुणी पदाचा राजीनामा दिला तर कुणी अन्य पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवली, , तर कुणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली. दिवसभरत हे नाराजी नाट्य सुरुच होते. त्यामुळे काही पक्षांच्या नेत्यांना आपले निर्णय बदलावे लागले तर काहींनी याची दखलही न घेता बंडखोरीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे बंडोबांना थंडोबा न झाल्याने विविध पक्षांमध्ये मोठ्याप्रमाणात बंउखोरी झाल्याचे दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करता उमेदवारी अर्ज भरण्याच्या मंगळवारी ३० डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रात्री उशिरापर्यंत पक्षाकडून नावे जाहीर न होणे आणि अधिकृत उमेदवारीचा ए व बी फॉर्म न मिळणे यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांकडून बंडाचे निशाण फडकावण्यात आले आहे. भाजपाने विद्यमान नगरसेविका आसावरी पाटील, नेहल शाह. सुरेखा पाटील यांच्यासह माजी नगरसेविकांचा पत्ता कापला. त्यामुळे आसावरी पाटील यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला आणि प्रभाग क्रमांक १४मधून उबाठाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला. तर माटुंगा येथील नेहल शाह यांच्या प्रभाग क्रमांक १७७मधून भाजपाने अन्य उमेदवाराला उमेदवारी जाहीर केल्यामुळे नेहल शाह यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या विनंतीचा मान देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर कांदिवलीतील सुरेखा पाटील यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याचे वृत्त आहे. याशिवाय भाजपामधील इच्छुक गजेंद्र धुमाळे, दत्ता केळुसकर, जान्हवी राणे, सुप्रिया पिंपळे, कमलाकर दळवी आणि जयश्री खरात यांनीही उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली आहे.


उबाठाचे परळ येथील माजी नगरसेवक आणि माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिक कोकीळ यांचाही पत्ता कापल्याने त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आणि त्यांना त्यांच्या प्रभागातून शिवसेनेच्यावतीने उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक १५५मधून उबाठाचे श्रीकांत शेट्ये हे आपल्या पत्नीसाठी इच्छुक होते. परंतु त्यांना उबाठाने मंजुरी नाकारल्याने श्रीकांत नार्वेकर यांनी पत्नीसह भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाच्यावतीने श्रीकांत शेट्ये यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच प्रभाग क्रमांक ५६मधून उबाठाने राजुल देसाई यांना उमेदवारी न दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर केल्यामुळे समीर देसाई आणि राजुल देसाई यांनी भाजपात प्रवेश केल्याचे वृत्त आहे. प्रभाग क्रमांक १९२ची ठाकरेंच्या युतीत मनसेला साेडण्यात आल्यामुळे मनसेच्यावतीने यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या आणि पक्षाच्या सरचिटणीस राहिलेल्या स्नेहल जाधव यांनी पदाचा राजीनामा देत माजी नगरसेवक सुधीर जाधव यांच्यासह शिवसेना पक्षात प्रवेश केला.


अपक्ष उमेदवारी अर्ज भरत कुणी केली बंडखोरी




  • उबाठाचे माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर (९५)

  • उबाठा माजी नगरसेवक कमलाकर नाईक(१६९)

  • भाजपा नगरसेविका नेहल शाह(१७७)

  • भाजपा गजेंद्र धुमाळे(२००)

  • भाजपाच्या माजी नगरसेविका सुरेखा पाटील(२७)

  • भाजपा दत्ता केळुसकर(१७३)

  • भाजपा जान्हवी जगदीश राणे(२०५)

  • भाजपा सुप्रिया पिंपळे (८४)

  • उबाठा सूर्यकांत कोळी(१९३)

  • मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर (११४)

  • उबाठा श्रावणी मंदार मोरे(७४)

  • भाजपाचे कमलाकर दळवी (२२५)

  • भाजपाच्या माजी नगरसेविका जयश्री खरात(१५५)

  • भाजपाच्या गीता कुतवडे (५२)


शिंदे शिवसेनेत कोण




  • उबाठाचे प्रकाश पाटणकर आणि प्रीती पाटणकर

  • उबाठाचे अनिल कोकिळ

  • मनसेच्या स्नेहल जाधव


भाजपात कोण




  • उबाठाचे श्रीकांत शेट्ये

  • उबाठाचे समीर देसाई


उबाठात कोण




  • भाजपा नगरसेविका आसावरी पाटील



राजीनामा




  • मनीष तिवारी, भाजपा मुलुंड

  • स्नेहल जाधव,मनसे,दादर

  • वरळी, परळ,विक्रोळी, दादरमधील उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे



Comments
Add Comment

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

आगामी अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'विकसित भारत २०४७' बैठक संपन्न

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थतज्ज्ञ व रणनीतीकार, निती आयोगाचे सदस्य,

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

KDMC Election 2026 : भाजपने मतदानाआधीच खातं उघडलं कडोंमपात भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध

डोंबिवली : महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या

आताची सर्वात मोठी बातमी: भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला!

मोहित सोमण: भारताच्या प्रातिनिधिक स्वरूपात अर्थव्यवस्थेचे जगभरात कौतुक होत असताना आता सरकारने आणखी एक मोठी

२०२५ मधील शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजीच, आज तेजी का राहील? वाचा आजची टेक्निकल पोझिशन

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सेन्सेक्स १९५ व निफ्टी ८०.८५ अंकांने