कल्याण-डोंबिवलीत शिवसेना उमेदवारांचा राजीनामा

मनसेमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश


कल्याण : कल्याण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आणि माजी शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांना निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाराज झालेल्या समेळ यांनी आपल्या ५० पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेकडून (शिंदे गट) मंगळवारी सामुहिक राजीनामा दिला. समेळ यांनी मागील पंधरा वर्ष कडोंमपात नगरसेवक म्हणून काम पाहिले असून, प्रभावी नेतृत्व, अभ्यासपूर्ण मांडणी आणि विकासकामांसाठी ओळख आहेत. त्यांनी अपेक्षा केली होती की त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना उमेदवारी मिळेल, मात्र पॅनल क्रमांक ९ मधून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी ही कठोर पावलं उचलली.


समेळ म्हणाले, “काहींनी स्वार्थासाठी आपल्या विषयी चुकीची माहिती नेत्यांना दिली असेल, त्यानुसार आपली उमेदवारी कापण्यात आली असेल तर ते चुकीचे आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी याचा विचार करावा. आपण उमेदवारी न मिळाल्यामुळे आणि निषेध म्हणून आपल्या पदाधिकाऱ्यांसह राजीनामा देत आहोत.”


डोंबिवली : डोंबिवलीतील आजदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि शिवसेना (शिंदे गट) शाखाप्रमुख जयंता दत्तु पाटील आणि त्यांची कन्या काजल जयंता पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने तात्काळ मनसेत प्रवेश करून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पाटील कुटुंबासोबत ५००हून अधिक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. पॅनल क्रमांक १९ मधून जयंता आणि काजल यांनी अर्ज दाखल केला तर पॅनल क्रमांक २२ मधून संदेश पाटील यांनीही मनसेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली.

Comments
Add Comment

केंद्रीय मंत्रिमंडळाची नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी

नवी दिल्ली :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ

२९ महापालिकांच्या निवडणुकीत तब्बल ३३ हजार ६०६ अर्ज

एका जागेसाठी सरासरी १२ उमेदवार रिंगणात; पुण्यात सर्वाधिक चुरस, मुंबईत अडीच हजार उमेदवार मुंबई : राज्यातील २९

रामदास आठवले यांचे बंड २४ तासांत झाले थंड - मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; भाजप-शिवसेना कोट्यातून १२ जागा मिळणार असल्याचा दावा

मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीच्या जागावाटपात सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत

निवणुकीपूर्वीच महायुतीला झटका: वॉर्डातून २ उमेदवार बाद

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला मतदानाआधीच मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील

मुंबईसह महानगरात महायुतीच्या सभांचा धडाका

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशभरातून स्टार प्रचारक येणार मुंबई : मिनी

ठाकरे गटाच्या ३५ उमेदवारांचे अर्ज धोक्यात, भाजपचा स्कॅन सह्यांवर आक्षेप

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गट यांच्यात कायदेशीर संघर्ष तीव्र