२०२५ मधील शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजीच, आज तेजी का राहील? वाचा आजची टेक्निकल पोझिशन

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सेन्सेक्स १९५ व निफ्टी ८०.८५ अंकांने उसळला आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी सकारात्मक सुरुवात गुंतवणूकदारांनी करुन दिली आहे. प्रामुख्याने जागतिक अस्थिरता कायम असताना युएस बाजारासह भारत व आशियाई बाजारात तेजीचा अंडरकरंट कायम दिसत आहे. काल युएस फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीनंतर १० वर्षाच्या यिल्ड (Yields) मध्ये किरकोळ वाढ झाल्यानंतर शेअर बाजारात आज बुस्टर डोस मिळाला आहे. त्यामुळेच सकाळच्या सत्रात रॅली झाली आहे. सकाळच्या सत्रात दोन्ही बँक निर्देशांकात देखील किरकोळ वाढ कायम राहिल्याने बाजाराला सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली. क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मेटल, मिडिया, कंज्यूमर ड्युरेबल्स, पीएसयु बँक, केमिकल्स निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली आहे. तर घसरण कुठल्याही निर्देशांकात झाली नाही. यासह व्यापक निर्देशांकात मिडकॅप १००, मिडकॅप ०.६४, मिडकॅप ५० निर्देशांकात झाली आहे. सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक १% पातळीपेक्षा घसरला असल्याने बाजाराला कुठला धोका दिसत नाही.


आशियाई बाजारातही सकाळच्या सत्रात संमिश्र प्रतिसाद दिसत आहे. बहुतांश निर्देशांकात वाढ झाली असली तरी काही निर्देशांकात घसरण कायम आहे. काल युएस बाजारातील अखेरच्या सत्रात डाऊ जोन्स वगळता उर्वरित एस अँड पी ५००, नासडाक कंपोझिट निर्देशांकात घसरण झाली. आज कच्च्या तेलाच्या व सोन्याच्या निर्देशांकात घसरण कायम असल्याने बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आपली गुंतवणूक राखू शकतात.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ राईट्स (६.९४%), आयएफसीआय (६.९२%), ज्युपिटर वॅगन्स (५.४३%), एचएफसीएल (४.६६%), दीपक फर्टिलायझर (४.४५%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण असाही इंडिया (३.३०%), मदर्सन वायरिंग (२.३६%), आदित्य एएमसी (१.८९%), एसकेएफ इंडिया (१.७४%), हिंदुस्थान कॉपर (१.७२%) समभागात झाली आहे.


आजच्या सुरूवातीच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'बाजारात वरच्या दिशेने मोठी हालचाल होण्याची क्षमता आहे, परंतु परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या (FII) सततच्या विक्रीमुळे आणि अमेरिका-भारत व्यापार आघाडीवरील सकारात्मक बातम्यांसारख्या नवीन घटकांच्या अभावामुळे बाजारावर दबाव येत आहे. येणारे दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत, ज्याची सुरुवात डिसेंबर महिन्याच्या वाहन विक्रीच्या आकडेवारीने, तिसऱ्या तिमाहीच्या कंपन्यांच्या निकालांनी, अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षांनी आणि २०२६ मधील संभाव्य फेडरल रिझर्व्हच्या कृतीसारख्या जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित इतर बातम्यांनी होईल. नफ्यात वाढीचे संकेत मिळवण्यासाठी तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागेल. हे महत्त्वाचे आहे कारण भविष्यात नफ्यात वाढ होईल अशी मोठी आशा आहे. २०२६ मध्ये बाजाराचा कल निश्चित करणारा नफ्यातील वाढ हा सर्वात महत्त्वाचा घटक असेल. २०२६ मधील परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा (FII) ओघ देखील नफ्याच्या कामगिरीवर आणि त्यासंबंधीच्या अपेक्षांवर अवलंबून असेल.'


आजच्या टेक्निकल पोझिशनसह भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,' काल २५८५० पातळीच्या पातळीकडे झालेल्या घसरणीमुळे खरेदीचा कल वाढला. परंतु, यामुळे दैनंदिन चार्टवरील इंडिकेटर्सना अजून तरी तेजीच्या उलटफेरचा संकेत देण्यास भाग पडलेले नाही. त्यामुळे, जोपर्यंत भाव २५९७० पातळीच्या खाली आहेत, तोपर्यंत आम्ही मंदीचा दृष्टिकोन कायम ठेवू, परंतु जर भाव २६०२७ च्या वर गेले, तर तेजीच्या संधी साधण्यासाठी आम्ही तयार राहू. अन्यथा, २५७४०-६५० पातळीपर्यंत घसरण अपेक्षित आहे, परंतु आज अशी हालचाल होण्याची शक्यता कमी आहे.

Comments
Add Comment

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

आगामी अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'विकसित भारत २०४७' बैठक संपन्न

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थतज्ज्ञ व रणनीतीकार, निती आयोगाचे सदस्य,

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच