सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गूगल तयार; बनवले खास डूडल

सर्वत्र नववर्षाची चाहूल लागली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण पार्टीचे आयोजन करत आहेत. या आनंदाच्या लहरींमध्ये आता गूगलने सुद्धा पुढाकार घेतला आहे. गुगलने आपल्या नावात नववर्ष चिन्हांकित केले आहे. ज्या आकर्षक दिसत असून आज सकाळपासून वापरकर्त्यांना नव वर्षाची ओळख करून देत आहे. ज्यात सोनेरी आणि रंगाचा वापर केला असून डूडल फुगे दिसत आहे.


गेल्या काही वर्षांत, गूगलचे नवीन वर्ष थीम असलेले डूडल एक डिजिटल आकर्षण बनले आहे. या साध्या डिझाईनमुळे देखील सर्व जगाला सामायिक करून घेण्याचा उत्साह दिसत आहे. २०२६ ची सुरुवात होत असताना, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला २०२५ चे गुगल डूडल वापरकर्त्यांना आवडले आहे. विशेष म्हणजे हे डूडल २०२५ मधील ५ हा आकडा वर सरकून खाली ६ आकडा येताना मज्जेशीर दिसत आहे. नागरिक २०२६ चे स्वागत आतषबाजीने, कौटुंबिक मेळाव्यांसह किंवा शांत चिंतनाने करत असले तरी, गूगल डूडलही त्यात सामाईक होणार आहे.




गूगलने तयार केलेले डूडल हे गडद सोनेरी रंगाचे आहे. ज्यात गूगलच्या इंग्रजी स्पेलिंगनुसार 'डबल ओ'ऐवजी २०२५ आणि २०२६ हे आकडे टाकले आहेत. तसेच एक चॉकलेटदेखील उघडतानाचे अॅनिमेशन दिसत आहे. हे अॅनिमेट केलेले डूडल पाहताना सकारात्मकता वाटत आहे. तसेच येणारे वर्ष आपल्या आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवोत, असा संदेशही त्यातून दिसत आहे.


Comments
Add Comment

पुतिन यांच्या घरावरील हल्ल्यानंतर रशियाकडून घातक ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्र तैनात

मास्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानी ड्रोन हल्ला झाल्यानंतर रशियाने

बांग्लादेशमध्ये दीपू दासनंतर तिसऱ्या हिंदूची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मैमनसिंग जिल्ह्यात

Khaleda Zia Death : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन

खालिदा झिया यांनी केवळ राजकारणच नव्हे, तर 'स्टाईल स्टेटमेंट'मधूनही गाजवलं सत्तेचं रणांगण! साधेपणा, काळा चष्मा

बांगलादेशात हिंदूंवर ईशनिंदेशी संबंधित ७१ हल्ले

एकसारखाच पॅटर्न - आधी सोशल मीडियावर आरोप, नंतर जमावाचा हिंदू वस्त्यांवर हल्ला ढाका : बांगलादेशात हिंदू

इंडोनेशियात भीषण दुर्घटना

जकार्ता : इंडोनेशियात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (२८ डिसेंबर) संध्याकाळी एका रिटायरमेंट होमला भीषण आग

बांग्लादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचं निधन

ढाका: बांग्लादेशच्या पहिला महिला पंतप्रधान खालिदा जिया यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही