मीरा-भाईंदरमध्ये भाजप - शिवसेना स्वबळावर

जोरदार शक्तिप्रदर्शन करत भरले नामांकन पत्र


भाजपचे ३ माजी महापौर रिंगणात; २४ वर्षीय युवतीला उमेदवारी


भाईंदर : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युती होणार किंवा नाही या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला असून दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवीत आहेत. भाजपा आणि शिवसेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी आपली नामांकन पत्रे भरली आहेत.


भाजपाने २४ वर्षीय युवतीला उमेदवारी देऊन निवडून आणण्याचे आव्हान स्वीकारल्यामुळे ती सर्वात कमी वयाची नगरसेविका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युती बाबतच्या चर्चेला यश न आल्याने दोन्ही पक्षांनी मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आपल्या उमेदवारांची नामांकन पत्र भरली आहेत. उबाठाचे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी वर्षाभरापूर्वीच भाजपात प्रवेश करून मुलगी आकांक्षा विरकर हिला शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या प्रभाग क्र. १० मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.


भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी आकांक्षाला निवडून आणण्याचा चंग बांधल्यामुळे आकांक्षा विरकर सर्वात कमी वयाची नगरसेविका होण्याची शक्यता आहे.


भाजपच्या ३ माजी महापौरांनी सुद्धा नामांकन पत्र भरली आहेत. तसेच उप महापौर हसमुख गहलोत यांनीसुद्धा पूर्वीच्याच प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही माजी नगरसेवकांच्या प्रभागात अदलाबदल करण्यात आली आहे. शहरातील ७ निवडणूक कार्यालयात सर्व पक्षीय उमेदवारांनी गर्दी केली होती. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), उबाठा, मनसे, रिपब्लिकन पार्टी, आम आदमी पार्टी, तसेच अनेक अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.


मीरा भाईंदरमध्ये भाजप ८६ जागा लढविणार; राष्ट्रवादी (अजित पवार) ८ तर १ आरपीआय ९५ जागांपैकी भाजप ८६ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासाठी ८ तर आरपीआय साठी १ जागा सोडण्यात आली आहे. आ.मेहता मेहता यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. भाजपने जागा वाटपात सर्व प्रादेशिक उमेदवारांना संधी दिली आहे. ७० हून अधिक उमेदवार जिंकण्याचा विश्वास नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Vinod Tawde : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे देशभरात एक महिन्याचे ‘सेवा संकल्प अभियान’

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी देशभरात

Navnath Ban : पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमात 'छात्रों की नव्हे पैशांची गूंज'

पुणे : पुण्यात राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर

Vande Mataram : ‘वंदे मातरम’च्या जनजागृतीसाठी भाजप राबवणार देशव्यापी मोहीम

नवी दिल्ली : ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताचा सन्मान आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शनिवारी

BJP Gen Z Campaign : भाजपकडून 'जेन झी' जोडणी मोहिमेसाठी विशेष पथक स्थापन

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने देशभरातील युवा पिढीशी (जेन झी) संवाद अधिक घट्ट करण्यासाठी आणि त्यांना पक्षाशी

Navnath Ban : ‘छात्रों की गूंज’ की ‘पैसों की गूंज’? राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर भाजपचे गंभीर आरोप; १० कोटींच्या खर्चाचा दावा

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून भाजपने गंभीर आरोप केले

Vishakha Raut News : विशाखा राऊतांचे जात प्रमाणपत्र रद्द; सदा सरवणकर, प्रिया सरवणकरांची एकनाथ शिंदेंशी भेट

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे