Ajit Doval : हक्कांविषयी बोलणाऱ्यांनी हक्कांचा गैरवापर केला तर... तरुणांविषयी नेमकं काय म्हणाले NSA अजित डोवाल ?

पुणे : यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अजित डोवाल यांनी त्यांच्या भाषणातून तरुणाईला थेट संबोधित केले. तसेच लोकमान्य टिळकांच्या कार्याचा गौरव केला.



टिळकांचे कार्य समजून घेण्यासाठी त्यावेळच्या परिस्थितीचा आणि अडचणींचा आधी विचार करावा लागेल. आपण त्या स्थितीची आता व्यवस्थित कल्पनाही करू शकत नाही. देशातल्या तरुण पिढीला वाटतं की भारत आधीपासून असा आहे. स्वातंत्र्य म्हणजे आताच्या तरुणाईच्या मते त्यांच्या इच्छेनुसार वागणे... पण हे स्वातंत्र्य नाही. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, संघर्ष केला, नेतृत्व दिलं त्यात लोकमान्य टिळक आघाडीवर होते.



स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांच्या मनात संताप होता. पण बोलण्याची अनेकांची हिंमत नव्हती. लोकांच्या मनात राग होता. पिडा होती. वेदना होती. पण कसे व्यक्त व्हावे ते समजत नव्हते. जे बोलत होते त्यांना मार्ग निघेल, प्रश्न सुटेल असे वाटत होते पण स्वातंत्र्यासाठी लढण्याची हिंमत कोणी दाखवत नव्हते. जे लढत होते ते संघटीत नव्हते. योग्य दिशा देईल असे नेतृत्व नव्हते. या परिस्थितीत लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. नेतृत्व करताना जे त्रास, वेदना सहन कराव्या लागल्या ते सर्व टिळकांनी सहन केले.


हल्ली लोकं हक्कांबद्दल बोलतात, पण त्याचा चुकीचा वापर होत असेल तर ते हक्क मिळवण्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं, सर्वस्व दिलं, त्यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील ? आज लोकमान्य टिळक आपल्यात असते तर त्यांनी काय नवा संदेश दिला असता. भारताला सशक्त आणि विकसित भारत बनवणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि मी हे करणारच असं ते म्हणाले असते, असं डोवाल म्हणाले.



कोण आहेत अजित डोवाल ?


अजित डोवाल हे २०१४ पासून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. त्यांनी याआधी प्रदीर्घ काळ गुप्तचर दलात अधिकारी पदावर काम केले आहे. ते १९६८ च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी २००४ ते २००५ या काळात आयबी प्रमुख म्हणून काम केले आहे. तसेच पाकिस्तानमध्ये सात वर्षे गुप्तचर म्हणून काम केले आहे. ऑपरेशन ब्लॅक थंडर अंतर्गत त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांची माहिती मिळवली होती. या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणेला कारवाई करणे सोपे झाले होते. मिझोराम आणि मणिपूरमधील बंडखोरी मोडून काढण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काश्मीरमधील दहशतवाद नियंत्रणात आणण्यातही त्यांची महत्त्त्वाची भूमिका आहे. किर्ती चक्र मिळवणारे ते पहिले आयपीएस आहेत. सध्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे.

Comments
Add Comment

Nashik : लग्न जमवण्याचे अमिष दाखवून स्मशानात अघोरी पूजा, भोंदू खंडागळे ताब्यात

Nashik : नाशिकमध्ये आणखी एका नव्या भोंदूबाबाचा नवा प्रताप समोर आला आहे. प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात

Nashik : सिन्नर-नाशिक महामार्गावरील L&T फाट्यावर कंटेनर पलटी, वाहतुकीवर परिणाम

Nashik : सिन्नर-नाशिक महामार्गावर (Sinnar-Nashik Highway) एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी असलेल्या L&T फाटा येथे आज भलामोठा कंटेनर वळण घेत

Nashik : अवघ्या काही तासांत पिंपळगाव कडवा कॅनलजवळ पुन्हा दुसरा अपघात; सिन्नर तालुक्यात खळबळ

Nashik : सिन्नर तालुक्यातील पांचाळे–सोमठाणे रस्त्यावरील पिंपळगाव कडवा कॅनलजवळ आज पहाटे सुमारे ६ वाजता भीषण अपघात

Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित

Pizza company gets fine : १० इंचाच्या ऐवजी मिळाला ७ इंचाचा पिझ्झा; ग्राहक आयोगाचा दणका, कंपनीला भरावा लागला मोठा दंड!

आजकाल ऑनलाइन जेवण मागवणे जितके सोपे झाले आहे, तितकेच त्यात फसवणुकीचे प्रकारही वाढले आह

Nashik : सिन्नर तालुक्यातील पिंपळगाव कडवा कॅनलजवळ भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Nashik : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. पांचाळे–सोमठाणे रस्त्यावर पिंपळगाव कडवा