सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार

८० हजार कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी


नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक झाली.या बैठकीत तिन्ही दलांच्या सुमारे ८० हजार कोटी रुपयांच्या विविध खरेदी प्रस्तावांना आवश्यकतेची स्वीकृती (एओएन) देण्यात आली. या बैठकीत भारतीय लष्करासाठी तोफखाना तुकडीसाठी लॉइटर म्युनिशन सिस्टम, कमी उंचीवरील हलक्या वजनाचे रडार, पीनाका या बहुप्रक्षेपक रॉकेट प्रणालीसाठी लांब पल्ल्याचा मार्गदर्शित रॉकेट दारूगोळा तसेच एकात्मिक ड्रोन वेधक नाशक प्रणाली एमके-२ च्या खरेदीला मंजुरी देण्यात आली.


लॉइटर म्युनिशनचा वापर लष्करी लक्ष्यांवर अचूक मारा करण्यासाठी केला जाईल, तर कमी उंचीवरील हलके रडार हे लहान आकाराच्या आणि कमी उंचीवर उडणाऱ्या मानवरहित हवाई यंत्रणांचा शोध घेतील. लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित रॉकेटमुळे पिनाका प्रणालीच्या पल्ल्याची व्याप्ती आणि अचूकता वाढणार असून, याद्वारे महत्त्वाच्या लक्ष्यांवर प्रभावी मारा करणे शक्य होणार आहे. तसेच, अधिक पल्ला असलेल्या एकात्मिक ड्रोन वेधक नाशक प्रणाली एमके २ मुळे युद्धभूमी आणि अंतर्गत भागातील भारतीय लष्कराच्या महत्त्वाच्या मालमत्तांचे रक्षण करता येणार आहे.


नौदलासाठी बोलार्ड पुल टग्ज, सॉफ्टवेअर चलीत उच्च ध्वनीलहरींचे रेडिओ मॅनपॅक यांची खरेदी आणि अति उंचावरील लांब पल्ल्याची विमान प्रणाली भाडेतत्त्वावर घेण्यासही या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बोलार्ड पुल टग्ज बंदरात नौदलाच्या जहाजांचे आणि पाणबुड्यांचे नांगर टाकण्यासाठी तसेच ये-जा करण्यासाठी मदतीचे ठरणार आहेत. सॉफ्टवेअर चलीत उच्च ध्वनिलहरींच्या रेडिओ मॅनपॅकमुळे मोहिमांदरम्यान लांब पल्ल्याचा सुरक्षित संवाद करता येणार आहे, तर उंचावरील लांब पल्ल्याच्या विमान प्रणालीमुळे हिंदी महासागर क्षेत्रात सतत देखरेख ठेवणे आणि सागरी क्षेत्राची नेमकी माहिती मिळत राहील याची सुनिश्चिती होणार आहे.


भारतीय हवाई दलासाठी स्वयंचलित टेक-ऑफ लँडिंग रेकॉर्डिंग प्रणाली, अस्त्र एमके २ क्षेपणास्त्रे, फुल मिशन सिम्युलेटर आणि स्पाइस-१००० या लांब पल्ल्याच्या मार्गदर्शक संचाच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर