मनसे उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये अनुभवी, स्थानिक प्रश्नांशी जोडलेले आणि कार्यक्षम उमेदवार मैदानात उतरवून मनसेने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्थानिक विकास आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर मनसेचा भर राहणार आहे. राज ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


मनसेची मुंबईतील प्रभाग क्र.१९२ यशवंत किल्लेदार, प्रभाग क्र. १८३ पारूबाई कटके, प्रभाग क्र ८४ रूपाली दळवी, प्रभाग क्र १०६ सत्यवान दळवी, प्रभाग क्र. ६८ संदेश देसाई, प्रभाग क्र. २१ सोनाली मिश्रा, प्रभाग क्र.११ कविता माने, प्रभाग क्र.१५० सविता थोरवे, प्रभाग क्र. १५२ सुधांशू दुनबाळे, प्रभाग क्र ८१ शबनम शेख, प्रभाग क्र.१३३ भाग्यश्री जाधव, प्रभाग क्र. १२९ विजया गीते, प्रभाग क्रमांक १८ सदिच्छा मोरे, प्रभाग क्र.११० हरिनाक्षी मोहन चिराथ, प्रभाग क्रमांक २७ आशा चांदर या यादीतून मनसेने महिला, युवक आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या उमेदवारांना संधी दिल्याचे स्पष्ट होते.

Comments
Add Comment

अमित शहांचा नांदेड दौरा रद्द ? नेमकं काय घडलं ?

नांदेड : शिखांचे नववे गुरु तेग बहाद्दूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त आयोजित ‘हिंद दि चादर’

किशोरी पेडणेकर यांच्या निवडीने पक्षात नाराजी

सर्वच पदे वरळीत देणार, तर मग इतरांनी काय करायचे? मुंबई : उबाठाच्या महापालिका गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड

'बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही'

राज ठाकरेंनी व्यक्त केल्या जयंतीदिनी आपल्या भावना मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्य' ?

मुंबई : महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्य'

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात ईडीकडूनही भुजबळांची निर्दोष मुक्तता

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला. गेल्या अनेक वर्षांपासून

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिवादन

मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय प्रवाहाला ठोस आकार देणारे नेते म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे