अखेर ठरलं! झेप्टोचा ११००० कोटीचा आयपीओ येणार !

मुंबई: विविध रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे झेप्टो (Zepto) या लोकप्रिय क्विक कॉमर्स व्यासपीठ ११००० कोटीचा आयपीओ बाजारात दाखल करत असल्याचे खात्रीलायक माहिती मिळत आहे. कंपनीने २६ डिसेंबरला सेबीकडे डीएचआरपी (Draft Red Hearing Prospectus DHRP) दाखल केला होता. कंपनीचा शेअर बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) होणार असून अद्याप प्राईज बँड आयपीओसाठी निश्चित करण्यात आलेला नाही.पब्लिक इशूसाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक माहिती गुप्त मार्गाने (Confidential Filling) सेबीकडे झाला करण्यात आली. सध्या कंपनीचे बाजार मूल्य ७ अब्ज डॉलर्सवर असून ते आयपीओनंतर आणखी वाढणार आहे.


जुलै २०२१ मध्ये कंपनीची स्थापना झाली होती. त्यावेळी क्विक कॉमर्स संकल्पना बाजारात नवीन आली होती. सुरूवातीच्या काळात कंपनीने महत्वाच्या शहरात डार्क स्टोअर्सची स्थापना केली होती. सध्या भारतातील मोठ्या शहरात २५० पेक्षा अधिक डार्क स्टोअर्स असल्याचे सांगितले जाते. यापूर्वीही कंपनीने स्थापनेनंतर मोठ्या प्रमाणात निधी उभारणी केली होती. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये कंपनीने फंडिंग राऊंडमार्फत ४५० दशलक्ष डॉलर्स (३७५०.४० कोटींची) निधी उभारणी केली होती.


आदित पालिचा, कैवल्य वोरा यांनी मिळून कंपनीची मुहूर्तमेढ रोवली होती. सध्या संपूर्ण भारतात २५० डार्क स्टोअर्स व्यतिरिक्त ९०० पेक्षा डार्क स्टोअर्स उभारली गेली आहेत. सध्या कंपनीचे एकूण मूल्य १६००० कोटी रूपये आहे. कंपनीने आतापर्यंत ब्लिंकीट, स्विगी मार्ट व इतर अशा दिग्गज कंपन्याना टक्कर दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय मार्ग निवडल्यामुळे झेप्टो सार्वजनिक अर्ज करण्यापूर्वी सेबीसोबत आपल्या मसुदा ऑफर दस्तऐवजावर अर्ज दाखल करू शकणार असून सध्याच्या बाजारातील अस्थिरतेचा परिस्थितीनुसार आपल्या योजनांमध्ये सुधारणा करू शकेल असे कंपनीने म्हटले.

Comments
Add Comment

Stock Market Investors Returns: अंतर्बाह्य संकटांना तोंड दिल्यानंतरही गुंतवणूकदारांची यावर्षी ३० लाख कोटींची कमाई

मोहित सोमण: मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूकदारांनी केलेली विक्री, युएससह टॅरिफबाबत असलेली अनिश्चितता, रूपयाचे

जीडीपीनंतर आता ग्राहक किंमत महागाई निर्देशांक मोजण्याच्या पद्धत बदल होणार! सरकारने महागाईवर केले मोठे विधान

मुंबई: सरकारने ग्राहक महागाई किंमतीचे मोजमाप करण्यासाठी असलेल्या पद्धतीत बदल करण्याचे ठरवले आहे.

गुजरात किडनी आयपीओचे गुंतवणूकदार १ दिवसात मालामाल! शेअर ६% प्रिमियमसह बाजारात सूचीबद्ध

मोहित सोमण: गुजरात किडनी अँड सुपर स्पेशालिटी लिमिटेड कंपनीचे शेअर बाजारात दमदार पदार्पण झाले आहे. सकाळी

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

मुंबई : भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री १० च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

नववर्षाचे स्वागत 'धमाकेदार' कमाईने! मोतीलाल ओसवालकडून कमाईसाठी १० शेअर्सच्या शिफारशी बाजारात...

मोहित सोमण: जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे जसे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले तसा मात्र चांगल्या फंडांमेटल

Khaleda Zia Death : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन

खालिदा झिया यांनी केवळ राजकारणच नव्हे, तर 'स्टाईल स्टेटमेंट'मधूनही गाजवलं सत्तेचं रणांगण! साधेपणा, काळा चष्मा