बांग्लादेशमध्ये दीपू दासनंतर तिसऱ्या हिंदूची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मैमनसिंग जिल्ह्यात आणखी एका हिंदू व्यक्तीचा जीव गेला आहे.ग्रामीण निमलष्करी दल 'अन्सार'मध्ये कार्यरत असलेले बजेंद्र बिस्वास यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी त्याच दलातील सहकारी नोमान मियाँ याला अटक करण्यात आली. ही घटना भालुका उपजिल्ह्यातील मेहराबारी परिसरात असलेल्या सुलताना स्वेटर लिमिटेड या कारखान्यात घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बजेंद्र बिस्वास आणि नोमान मियाँ हे दोघे एका खोलीत बसले असताना अचानक नोमानने कोणताही वाद नसताना बजेंद्रवर बंदूक रोखली आणि गोळी झाडली. गोळी त्यांच्या डाव्या मांडीला लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


बजेंद्र बिस्वास हे सिल्हेट सदर उपजिल्ह्यातील कादिरपूर गावचे रहिवासी होते. ते अन्सार दलात कार्यरत होते आणि कारखान्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आरोपी नोमान मियाँ हा सुनामगंज जिल्ह्यातील ताहिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. लबीब ग्रुपसाठी नियुक्त अन्सारचे प्रभारी अधिकारी एपीसी मोहम्मद अझहर अली यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी कोणताही वाद किंवा भांडण सुरू नव्हते. अचानक घडलेल्या या गोळीबाराने सर्वजण हादरून गेले. सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बजेंद्र आणि नोमान यांच्यात यापूर्वी कोणतेही वैमनस्य नव्हते.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

Donald Trump : ट्रम्प प्रशासनाकडून इराणला मदत करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर निर्बंध

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

US Immigration News : अमेरिकेत मोठा भूकंप! ट्रम्प सरकारचा दणका, 2 लाख परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द होण्याची शक्यता

अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या सुमारे 2 लाख परदेशी नागरिकांचे B1 आणि B2 व्हिसा रद्द करण्याच्या तयारीत

Unrest in Pakistan : बलुचिस्ताननंतर आता ‘सिंधुदेश’च्या मागणीने जोर पकडल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात आणि सुरक्षेत सध्या मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK)

Hindu family murdered in Bangladesh : बांगलादेशात हिंदू कुटुंबातील चौघांची हत्या; याबा सेवनाला विरोध केल्याचा पोलिसांचा दावा, दोन्ही आरोपींचा कबुलीजबाब

रंगपूर : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. माचुआपारा